• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुक्यात ३० एकर क्षेत्रात कलिंगड लागवड

by Manoj Bavdhankar
January 16, 2023
in Guhagar
171 2
0
Watermelon Demonstration at Madhal
336
SHARES
961
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मढाळ येथे  कलिंगड प्रात्यक्षिक; खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांची गरज

गुहागर, ता. 16 : कलिंगड पिकाच्या योग्य वाढीसाठी तसेच उत्तम प्रकारे उत्पादनही गरजेचे असते. चांगल्या चवीचे कलिंगड उत्पादीत होण्यासाठी पिकाच्या विविध अवस्थेत पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करण्याची गरज असल्याची माहिती  पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी  दिली. Watermelon Demonstration at Madhal

पंचायत समिती गुहागरच्या सन २०२२-२३ या वर्षी राबविण्यात येणाऱ्या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांत पौनीकर यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मढाळ येथील प्रगतिशील शेतकरी नरेंद्र चव्हाण यांच्या शेतावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. Watermelon Demonstration at Madhal

कलिंगड पिक हे कमी कालावधीतील ‘कॅश क्रॉप’ असलेले पिक आहे. मात्र सुरूवातीला बियाण्याची पेरणी करताना ज्या पद्धतीने सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर वेलींची वाढ होताना पिकाच्या त्या -त्या अवस्थेत योग्य वाढीसाठी तसेच उत्तम प्रकारे उत्पादना, चांगल्या प्रकारे चव निर्माण होण्यासाठी १९:१९:१९, १३:६१:०, १३:०:४५, ०:०:५० या  पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर  योग्य प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे मतही पौनीकर यांनी व्यक्त केले. Watermelon Demonstration at Madhal 

प्रगतीशिल शेतकरी नरेंद्र चव्हाण यांनी यावेळी त्यांचे कलिंगड लागवडीचे अनुभव सांगितले. केवळ चारच प्रकारचे नाही तर आणखी इतर प्रकारच्या ग्रेडच्या पाण्यात विरघळणा-या खतांचा वापर आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य प्रकारच्या कलिंगड जातीचा वापर करणे आवश्यक आहे. ज्या जातींमध्ये गोडवा अधिक व टिकाऊ पणा अधिक अशा कलिंगडला बाजारात मागणी अधिक असते असा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. Watermelon Demonstration at Madhal

यावेळी कलिंगड लागवड करणारे शेतकरी लक्ष्मण कुंभार,समीर रहाटे, सतीश धावडे, तुषार ठोंबरे, रविंद्र कारकर, चंद्रशेखर गुरव, प्रवीण गावडे, दिपक चव्हाण,विजय रांजणे, यांच्यासह  इतर शेतकरी उपस्थित होते. Watermelon Demonstration at Madhal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWatermelon Demonstration at Madhalगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share134SendTweet84
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.