गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका यांच्या वतीने पाणी टंचाईग्रस्त जानवळे चर्मकार वाडीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. जानवळे वार्ड क्रमांक १ मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. Water supply to village by MNS
या वाडीसाठी असणारी नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सदर योजना जलजीवन मिशन योजनेमध्ये मंजूर आहे. जलजीवन मिशन योजनेचा ठेकेदार याच्याशी ग्रामपंचायत तसेच स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणचे काम लवकर करावे यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत. परंतु ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक यांच्या मागणीची दखल ठेकेदार कडून घेतली जात नाही. अखेर ग्रा. प. ने या भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल, असे सतत पाठपुरावा करणाऱ्या मनसेचे तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांना पत्राद्वारे कळविले होते. परंतु, भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत उप अभियंता, पाणी पुरवठा उप विभाग गुहागरला पाणी पुरवठा करण्याचे कागदी घोडे नाचविण्याआधी मनसेने आपल्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा केला आहे. Water supply to village by MNS
यामुळे जानवळे नागरिकांतून मनसेचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर व कार्यकर्ते उपस्थित होते. Water supply to village by MNS