धोपावेत नासीम मालाणी यांच्या अर्थसाह्यातून 2 टँकर
गुहागर, ता. 08 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे. शासनाद्वारे 4 गावातील 5 वाड्यांना टँकरने पाणी सुरु आहे. तर आरजीपीपीएलद्वारे तीन ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा सुरु आहे. काताळे ग्रामपंचायतीमधील नवानगर येथे टँकरच पोचु शकत नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. धोपावेत नासीम मालाणीच्च्या अर्थसाह्यातून 2 टँकर येत असून साखरी त्रिशुळचे सरपंच स्वत:च्या बोअरवेल वरुन 1 वाडीला पाणी पुरवठा करत आहेत. Water supply by tanker to 5 wadis in Guhagar
गुहागर तालुक्यातील मळण गवळवाडी (25 लोकसंख्या) येथे 30 मे पासून दर चार दिवसांनी टँकर सुरु आहे. सडेजांभारी खुर्द येथील 584 लोकसंख्येला पाणी टंचाई जाणवत असून तेथे 20 मे पासून दर दोन दिवसांनी एक टँकर पाठवला जातो. साखरी त्रिशुळ गवळवाडीतील 132 लोकसंख्येसाठी पंचायत समितीतर्फे चार दिवसांतून एकदा टँकर पाठवला जात आहे. पाऊस लांबल्याने येथील सुतारवाडी व आजपर्यंत कधीही पाणी टंचाई जाणवली नव्हती अशा साखरी त्रिशुळ मोहल्ला येथेही प्रथमच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सुतारवाडीतील ग्रामस्थांसाठी अजुनही पाण्याची व्यवस्था झालेली नाही. मोहल्ल्यातील ग्रामस्थांना सरपंच सचिन म्हसकर यांनी स्वत:च्या बोअरवेल वरुन दिड कि.मी. पाईप टाकून पाणी दिले आहे. Water supply by tanker to 5 wadis in Guhagar
धोपावे ग्रामपंचायतीमधील जवळपास सर्वच वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या धोपावे तरीबंदर येथील 688 व खारवीवाडीतील 885 लोकसंख्येसाठी 15 मे पासून दोन दिवसांनी पंचायत समितीकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय पाणी कमिटीने असलेल्या पाण्याचे नियोजन करुन पूर्व विभागातील तीन प्रभागांना दोन दिवसाआड 1 प्रभाग या पध्दतीने गोठणीवरील पाण्याचा पुरवठा केला आहे. तर पश्चिम विभागाला कुळेवाडी येथील जॅकवेलवरुन तीन दिवसांनी पाणी पुरवले जात आहे. खारवीवाडीतील ग्रामस्थांची संख्या मोठी असल्याने दरवर्षीप्रमाणे देणगी गोळा करुन पाणी पुरवठा करण्याचा निर्णय येथील तरुण कार्यकर्त्यांनी घेतला होता. याच कार्यकर्त्यांमधील आशिर्वाद पावसकर हे सरपंच आहेत. त्यामुळे त्यांनी पाणी कमिटीसह पुढाकार घेत देणगीदार शोधण्यास सुरवात केली. यावेळी मालाणी ग्रुपचे नासीमशेठ मालाणी यांनी आवश्यक तितके दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्यास आर्थिक मदत देण्याचे कबुल केले. त्यामुळे नासीमशेठ यांच्या आर्थिक सहकार्यातून धोपावे येथे सकाळी 1 व सायंकाळी 1 असे दोन टँकर सुरु करण्यात आले आहेत. Water supply by tanker to 5 wadis in Guhagar
वेलदूर व रानवी या दोन गावांत जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली. सुरवातीला या दोन्ही ग्रामपंचायतीनी ग्रामनिधीतून आपल्या गावातील वाड्यांना एक दिवस आड टँकरने पाणी पुरवठा केला. फेब्रुवारी अखेर अंजनवेल गावातील कातळवाडी व सुतारवाडीला टंचाई जाणवू लागली. 19 एप्रिलपासून आरजीपीपीएलने या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. Water supply by tanker to 5 wadis in Guhagar