गुहागर, ता. 03 : अखेर गुहागरच्या आरजीपीपीएल कंपनीकडून रानवी, अंजनवेल, वेलदूर या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. गेले 15 दिवस कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून या तिन्ही गावांनी पाठपुरावा केला होता. 1 मे महाराष्ट्र दिनापासून हा पाणीपुरवठा सुरु झाला आहे. Water supply by tanker
यावर्षी उन्हाळा अधिक तीव्र झाला आहे. तापमानवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पाणीटंचाईचे चटके एप्रिलपासूनच बसू लागले आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल, रानवी, वेलदूर या तीन गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. अंजनवेलमध्ये तर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींनी आरजीपीपीएलला पत्रव्यवहार करुन टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. अखेर कंपनीने त्यांची मागणी मान्य करून १ मे पासून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. Water supply by tanker
रानवीसाठी दररोज 2 टँकरने एकूण 20 हजार लिटर पाणी, वेलदूरला दररोज 3 टँकरने 30 हजार लिटर पाणी तर अंजनवेलला 3 टँकरने 30 हजार लिटर पाणी पुरविण्यात येत आहे. पाणी योजनेच्या टाक्यांमध्ये टँकरने पाणी सोडले जाते व तेथून गावांना हा पाणीपुरवठा केला जात आहे. Water supply by tanker