गुहागर, ता. 01 : गेल्या वर्षी मौसमी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे पाच-सहा महिने सलग पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यंत पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यांना बळकटी मिळाली होती. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण १७३ धरणांमध्ये मे अखेरपर्यंत फक्त ३३.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १.३४ टक्क्यांनी घट झाली आहे. Water levels in dams have dropped

मौसमी पावसाला अद्याप काही दिवस बाकी असल्याने कोकणात पाणीटंचाईच्या झळा आणखी वाढणार आहेत. कोकणात सर्वसाधारणपणे दरवर्षी अडीच हजार ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. कोकणातील पाचही जिल्ह्यांत अनेक भागांमध्ये महापूर येणे हे नेहमीचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी येथील महापूराच्या घटनांनी हाहाः कार माजविलेला होता. त्यामुळे येथे पावसाळ्यातील पाण्याची उपलब्धता कशी आहे हेही दिसून येते. मौसमी हंगामात पडणारे पावसाचे पाणी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून वाहत थेट समुद्राला जाऊन मिळते. मात्र पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळा आला की कोरड्या पडतात. धरणांची पातळी झपाट्याने खाली येते. त्यामुळे गाव, वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु होते. Water levels in dams have dropped
उन्हाळा सुरु झाला की कोकणातील पाण्याची समस्या गंभीरस्वरुप धारण करते. ही समस्या दरवर्षी असते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाईमुळे कोकणातील शेकडो गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. कोकणात राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारित मोठी, मध्यमआणि लहान अशी तीन प्रकारची एकूण १७३ धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ३ हजार ८६७.६८ दशलक्ष घनमीटर आहे. जलसंपदा विभागाने ३१ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मोठ्या ११ धरणांमध्ये ८४६.८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या वर्षी ३२.९५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १.७८ टक्क्यांनी तो जास्त आहे. Water levels in dams have dropped