शिवकालीन युद्ध कलेचे व मर्दानी खेळाचे प्राथमिक शिक्षण गरजेचे; पोलीस निरीक्षक सचिन सावंत
गुहागर, ता. 16 : शिवकालीन युद्ध कलेचा समृद्ध वारसा जोपासण्यासाठी शिवकालीन युद्ध कलेचे व मर्दानी खेळाचे प्राथमिक शिक्षण गरजेचे आहे. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथे केले. War Training camp
गुहागरात श्री दशभुज फाऊंडेशन व रत्नागिरी जिल्हा मर्दानी खेळ असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन युद्ध कलेचे व मर्दानी खेळांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या मैदानावर करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ गुहागर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नवोदय विद्यालयासाठी शहरी विभागातुन निवड झाल्याबद्दल गुहागर नं १ प्रशालेचे विद्यार्थी स्वराज बाबासाहेब राशिनकर व अनादी हृषिकेश घाडे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अमोल धुमाळ यांचा त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. War Training camp
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद व ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, रत्नागिरी जिल्हा हौशी ज्युडो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे सामाजिक कार्यकर्ते प्रभूनाथ देवळेकर श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक विलास कोरके, पर्यवेक्षिका सुजाता कांबळे, मधुकर गंगावणे उद्योजक विरेंद्र पाकळे, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक चिन्मय गुरव व सुलक्षणा राशिनकर शिक्षक वृंद पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. War Training camp
दिनांक १४ एप्रिल ते १९ एप्रिल २०२४ या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात लाठी काठी, तलवारबाजी, सुरल दांडपट्टा व अन्य खेळ सायंकाळी चार ते सात या वेळेत शिकवले जाणार आहेत. या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी शिबीराचे मुख्य संयोजक श्री बाबासाहेब राशिनकर ( सर) 9403845584 /9922452635 सौ.सुलक्षणा राशिनकर (मॅडम) 9657468264 यांच्याशी संपर्क साधावा. शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिरात शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवुन शिवकालीन युद्ध कलेचा समृद्ध वारसा जोपासण्याच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. War Training camp