• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाकीत ९ व १० मे रोजी रंगणार क्रिकेटचा थरार

by Guhagar News
May 7, 2026
in Guhagar
102 2
2
Waki Premier League

Waki Premier League

201
SHARES
575
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्राम विकास समिती करणार क्रीडा संस्कृतीचा संस्कार

गुहागर, ता. 7 : Waki Premier League वाकी गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने वाकी गाव विकास समितीच्या वतीने “वाकी प्रीमियर लीग २०२६” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा दि. ९ मे व १० मे २०२६ रोजी कै. वासुदेव महाजन (गुरुजी) क्रीडानगरी, वाकी येथे उत्साहात पार पडणार आहे. ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्याबरोबरच युवकांमध्ये संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Waki Premier Leagueचे हे पहिले पर्व असून, यामध्ये गावातील दहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमुळे गावात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी आणि मोठ्या स्पर्धांकडे वाटचाल करण्यासाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामागे गावाच्या विकासाची व्यापक संकल्पना असून, क्रीडा माध्यमातून सामाजिक एकोपा वाढवणे, युवकांना सकारात्मक दिशा देणे आणि गावाच्या नावाला एक वेगळी ओळख मिळवून देणे हा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Waki Premier League
Waki Premier League

Waki Premier League स्पर्धेचे सामने कै. वासुदेव महाजन (गुरुजी) क्रीडानगरी येथे रंगणार असून, प्रेक्षकांसाठीही विशेष सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चुरशीचे सामने, आकर्षक बक्षिसे आणि क्रीडाप्रेमींसाठी आनंददायी वातावरण असे विविध पैलू अनुभवायला मिळणार आहेत.

Waki Premier League

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून श्री. संजय शं. गमरे व श्री. रमेश र. पागडे कार्यरत आहेत. अध्यक्षपदी श्री. विलास सो. सोलकर, उपाध्यक्ष म्हणून श्री. अमित शां. काताळे व श्री. संतोष धों. काताळे, सचिवपदी श्री. मंगेश सु. गोवळकर तसेच खजिनदार म्हणून श्री. विठ्ठल गं. काताळे कार्यभार सांभाळत आहेत. सह-खजिनदार म्हणून कु. विकी वि. काताळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्रचार-प्रसाराची जबाबदारी श्री. योगेश सु. गोवळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. Waki Premier League

Waki Premier League
Waki Premier League

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश पागडे, विलास सोलकर, अनिल शां. काताळे, तानाजी गोवळकर, प्रविण गोवळकर, विजय पागडे, यशवंत गोवळकर, प्रभाकर काताळे, हरिश्चंद्र काताळे, सुधाकर सो. काताळे, गणपत नावले, सुरेश पागडे, सिद्धार्थ गमरे, राहुल मोहिते, अभिषेक काताळे, मंगेश दे. काताळे, प्रविण सं. काताळे, धर्माजी गोवळकर, योगेश दौ. काताळे, गोपाळ काताळे, जयेश पागडे, दिपक सोलकर, अनिल गमरे, विठ्ठल काताळे, राकेश पागडे, अजित ल.काताळे, योगेश गोवळकर आदी विशेष मेहनत घेत आहेत. या स्पर्धेसाठी गावातील पूर्ववाडी, पश्चिमवाडी, स्वातंत्र्यवाडी, समतानगर या चार वाड्यातील सर्व महिलांनी  स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे.

Waki Premier League या स्पर्धेला गुहागर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने वाकी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे आणि या क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला आहे.

एकूणच, “वाकी प्रीमियर लीग २०२६” ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडात्मक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWaki Premier Leagueटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.