• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 May 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारतीय संस्कृती संपविण्याचे जागतिक षडयंत्र

by Mayuresh Patnakar
May 3, 2026
in Maharashtra
16 0
0
Journalists honored with the 'Devarshi Narad Journalist Award,' alongside distinguished dignitaries.

Journalists honored with the 'Devarshi Narad Journalist Award,' alongside distinguished dignitaries.

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अभिजित जोग, चिपळूणात देवर्षी नारद पुरस्काराचे वितरण

गुहागर, ता. 3 : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम संपविण्यासाठी जागतिक स्तरावरुन मोठे प्रयत्न डावी विचारसरणी करत आहे. या धोक्यांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी मांडले. ते चिपळूण येथे देवर्षी नारद पत्रकार सन्मान कार्यक्रमात बोलत होते. Devarshi Narad Journalist Award

Sameer Jadhav accepting the Devarshi Narad Journalist Award.
Sameer Jadhav accepting the Devarshi Narad Journalist Award.

Why called Devarshi Narad Journalist Award?

नारद मुनी (Devarshi Narad) आकाश, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये मुक्तपणे फिरत असतं. देव दानव आणि मानव यांच्याशी सडेतोडपणे संवाद साधत असत आणि सत्य परिस्थिती मांडत असत. माहितीच्या या देवाणघेवाणीमध्ये सामाजिक हिताचा उद्देश होता. लोककल्याणाचा विचार होता. देवर्षी नारद यांचे हे गुण पत्रकाराच्या अंगी असले पाहिजेत, म्हणून त्यांना आद्य पत्रकार असे भारतीय परंपरेत म्हटले जाते. विश्र्व संवाद केंद्र ही संस्था भारतीय तत्त्वज्ञानाचा, हिंदू संस्कृतीचा परिचय सर्वांना व्हावा यासाठी काम करते. माध्यम क्षेत्रात राष्ट्रीय दृष्टिकोन मांडणारी आणि सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देणारी ही संस्था आहे. १९९२ मध्ये या संस्थेच्या कामाला सुरवात झाली. आज देशभरात ३० पेक्षा अधिक केंद्रे कार्यरत आहेत. सर्वच माध्यमांमधील पत्रकार, लेखक आणि साहित्यिकांशी संवाद साधणे, राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या विषयांवर संशोधन करणे, समाजात चर्चा घडवून आणणे, तरुण पत्रकारांसाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. राष्ट्रीय विचारानुरूप कार्य करणाऱ्या संस्थांबद्दल योग्य माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवणे. असे कार्य ही संस्था करते. त्याचबरोबर ही संस्था दरवर्षी पत्रकारांना ‘देवर्षी नारद पुरस्कार देवून सन्मानित करते. Devarshi Narad Journalist Award

Shekhar Samant accepting the Devarshi Narad Journalist Award.
Shekhar Samant accepting the Devarshi Narad Journalist Award.

चिपळूण मधील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात (DBJ College) आज देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधन व लेखक श्री. अभिजीत जोग, जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक श्री. प्रसाद काथे आणि  ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेश जोष्टे उपस्थित होते. यांच्या हस्ते रायगडमधील मुरुडचे पत्रकार मेघराज जाधव, सिंधुदुर्गमधील शेखर सामतं (तरुण भारत),  समीर जाधव (दै. पुढारी, चिपळूण),  मयुरेश पाटणकर (दै. सकाळ गुहागर) आणि यु ट्वुबर ऋषभ तोडणकर (गावखडी, रत्नागिरी) यांना देवर्षी नारद पत्रकार सन्मान देवून गौरविण्यात आले. देवर्षी नारदांची मुर्ती, नारद मुनींच्या कार्याची माहिती असणारे पुस्तक व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते. Devarshi Narad Journalist Award

Mayuresh Patankar accepting the Devarshi Narad Journalist Award.
Mayuresh Patankar accepting the Devarshi Narad Journalist Award.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक श्री. प्रसाद काथे यांनी विश्र्व संवाद केंदाच्या कार्याची माहिती व पत्रकार सन्मान पुरस्करासाठी असलेल्या निवड प्रक्रियेची माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे राजेश जोष्टे यांनी आजच्या काळातील पाकीटबाज पत्रकारांच्या भुमिकेवर टिका करत विकासाची पत्रकारिता करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. Devarshi Narad Journalist Award

Meghraj Jadhav accepting the Devarshi Narad Journalist Award.
Meghraj Jadhav accepting the Devarshi Narad Journalist Award.

अभिजित जोग म्हणाले की, अमेरिकसह अन्य तीन देशांनी निर्माण केलेली डिप स्टेट ही व्यवस्था काही देशांमधील सत्ता उलथवून लावली. जगातील विविध देशात सुदृढ लोकशाही यावी असे दाखवून या देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न डिप स्टेटच्या माध्यमातून होत आहे. भारतातही हा प्रयत्न सुरु आहे. त्यासोबत सांस्कृतिक मार्स्कसिझमचा धोकाही आपल्यासमोर आहे. वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला भारत देश हिंदुत्वाच्या धाग्यांनी घट्ट जोडला गेला आहे. हे धागे तोडण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे, आपल्याच देशातील काही लोकांना पैसा आणि टुलकीट देवून काम सुरू आहे. या सर्व धोक्यांबाबत हिंदू समाजाला जाणिव करुन देण्याची गरज आहे. Devarshi Narad Journalist Award

Rishabh Todankar accepting the Devarshi Narad Journalist Award.
Rishabh Todankar accepting the Devarshi Narad Journalist Award.

या कार्यक्रमाला विश्र्व संवाद केंद्राचे डॉ. निशिथ भांडारकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदिप खरे, संघाचे विभाग संघचालक दत्ता सोलकर, प्रांत प्रचार प्रमुख लक्ष्मीकांत नकाशे, प्रांत कार्यकर्ते प्रसाद आगवेकर, विभाग सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे व डॉ. पंकज दिघे चार्टर्ड अकाउंटंट मंदार लेले, घरडा अभियांत्रिकीमधील प्राध्यापक डॉ. सुदेश आयरे, डॉ. विकास नातू, युनायटेडचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे, व्यापारी उदय चितळे, लोटिस्माचे संचालक विनायक ओक, किर्तनकार शरद तांबे, ज्योतिषी खांडेकर, यांच्यासह चिपळूणमधील प्रतिथयश मान्यवर उपस्थित होते. Devarshi Narad Journalist Award

Tags: Devarshi Narad Journalist AwardGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi Newsचिपळूणटॉप न्युजताज्या बातम्यादेवर्षी नारद पत्रकार सन्मानमराठी बातम्यालोकल न्युजविश्र्व संवाद केंद्र
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.