• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत वाघबारस व तुळशी विवाह उत्सव

by Guhagar News
December 4, 2023
in Guhagar
221 2
0
Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli
434
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरा रुढी व सण  जोपासण्यासाठी गुहागर तालुक्यातील आबलोली गावातील ग्रामस्थ अजूनही प्रयत्नशिल असून दिवाळी नंतर अवघ्या बारा दिवसांनी येणाऱ्या या वाघबारस सणाचं महत्व व प्रथा टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पागडे वाडीतील मंडळी  व  या सणासाठी खास मुंबई पुण्याहूनही चाकरमानी अगदी आवर्जून उपस्थित राहून एकत्र येऊन आजच्या वैज्ञानिक व आधुनिक युगातही  लोप पावत चाललेल्या प्रथांपैकी  वाघबारस हा सण अगदी उत्साहाने  साजरा  करतात. Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli

Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli

जून्या जाणत्या मंडळींच्या  माहितीनूसार हा सण गुराख्यांशी संबंधीत असून शेतीची कामे आटोक्यात आल्यानंतर धनधान्याने भरलेल्या शेतीची मळणी करून  दाणा घरात घेतल्यानंतर  गुरे  जंगलात उनाड सोडून दिली जातात. म्हणून वाघापासून आपल्या गुराढोरांचं  रक्षण व्हावे यासाठी सर्व गावकरी गुराखी  एकत्रित जमून गुरांची गोठण असलेल्या गोठण देवाला साकडे घालून व भाताचा नैवेद्य देवून वाघाला गावातून पिटाळून लावतात. अशी या सणाची आख्यांकीका आहे.  या कार्यक्रमात सर्व सहभागी होऊन वाघाची वेशभूषा केलेल्या वेशधारी वाघाला पळवून लावतात.  वाघरो-वाघरो अशी गर्जना  देत फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून सोडतात. Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli

वैज्ञानिक आणि आधुनिक युगात लोप पावत चाललेली ही प्रथा आबलोली गावातील दोन्ही पागडेवाडितील गावकरी मंडळी व विशेष  करून सध्याची नविन पिढी यात अगदी हौसे मौजेने भाग घेतात. या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सायंकाळी प्रत्येक घरातील अंगणातील तुळशीचा विवाह अंगणात शेणाचा सडा काढून व नक्षीदार रांगोळी काढून तुळशीला साज चढवून पारंपारिक पध्दतीने लग्न लावली जातात. आजच्या आधुनिक युगात पारंपारिक अशा सणांचं महत्व टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. Waghbaras and Tulsi marriage festival in Abloli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWaghbaras and Tulsi marriage festival in Abloliगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share174SendTweet109
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.