• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भजन श्रृंखलेने महाशिवरात्र साजरी

by Mayuresh Patnakar
March 8, 2024
in Guhagar
125 1
0
Vyadeshwar Festival

भजन सादर करताना ठाण्यातील महिला

245
SHARES
699
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्याडेश्र्वर देवस्थानमध्ये भक्तांची गर्दी

गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आज दिवसभर भजन शृंखलेने विविध गावातील भजनमंडळींनी व्याडेश्र्वर देवस्थान परिसरातील वातावरण भक्तीमय केले होते. Vyadeshwar Festival

आज महाशिवरात्री उत्सवनिमित्त सकाळी ७ ते 9.30 वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व लघुरुद्र असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. लघुरुद्राची आवर्तने संपल्यावर  दु. 12 वा. महाआरती करण्यात आली. गुहागर शहरात प्रथमच भजन शृंखलेचे आयोजन व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत अनुपम भक्ती मंडळ ठाणे या भजन मंडळीनी भजनाला सुरवात केली. या भजन मंडळींचे वैशिष्ट्य म्हणजे तबला, पेटी, तालवादकांसह सर्व चमुत 60 ते 65 महिलांचा समावेश होता. जागतिक महिला दिनानिमित्त केवळ महिलांचे भजनाचे आयोजन करुन देवस्थाने शिव आणि शक्तीचे दर्शन घडविले.  भजन शृंखलेतील दुसरे कडे जय बजरंक प्रासादिक भजन मंडळ पिंपर यांनी गुंफले. बुवा दत्तात्रय रहाटे यांनी या चमुचे नेतृत्त्व केले.  त्यानंतर कलावती आई भजन मंडळाने आपली सेवा सादर केली. कल्याणी स्तोत्र मंडळाच्या महिलांनी जगद्‌गुरु शंकराचार्य रचित संस्कृत स्तोत्रांचे सादरीकरण केले.  त्यानंतर सुरभि भजन मंडळ खालचापाट  आणि स्वर साधना महिला भजन मंडळाचे सादरीकरण केले. Vyadeshwar Festival

कोणत्याही उत्सवामध्ये भक्तीमय निर्मितीसाठी सतत वेगवेगळी भक्तीगीते ध्वनीक्षेपकावर लावली जातात. यावर्षी प्रथमच ध्वनीक्षेपकावरुन विविध भजनी बुवांच्या शैलीतील भक्तीपूर्ण गीते सर्वांना ऐकायला मिळाली. या नाविन्यपूर्ण कल्पनेचे भाविकांनी स्वागत केले. दरम्यान आज सकाळपासून श्री देव व्याडेश्र्वर महाराजांच्या दर्शना करीता मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीची सुट्टी आणि जोडून आलेला दुसरा शनिवार, रविवार असल्याने व्याडेश्र्वर महाराजांची पूजा करण्यासाठी अनेकजण मुंबई पुण्यातून दाखल झाले होते. त्यामुळे दर्शनाबरोबरच पुजा अभिषेकासाठीही गर्दी पहायला मिळाली. तालुक्यातही विविध ठिकाणी महाशिवरात्री आनंदाने साजरी केली जात आहे. Vyadeshwar Festival

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVyadeshwar Festivalगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.