• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुडली माटलवाडी शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

by Guhagar News
April 27, 2024
in Guhagar
69 1
0
Voting awareness program
135
SHARES
387
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी येथे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या समवेत गावातून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी घोषणा व विविध गाण्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. Voting awareness program

यावेळी शाळा स्तरावर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. तसेच बाहेरगावी असणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांनी पत्र लिहून मतदानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यानंतर मतदान जनजागृती साठी वेळोवेळी फलक लेखन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सभा व पालक सभा घेऊन ग्रामस्थांना शंभर टक्के मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख श्री. परवेज चिपळूणकर यांनी वेळोवेळी उपस्थित राहून या उपक्रमाला मार्गदर्शन व सहकार्य केले. या शाळेतील माजी शिक्षक व बी एल ओ  गणेश वायचाळ यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. Voting awareness program

शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड, पदवीधर शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड व स्वयंसेवक सौरभ कटनाक यांनी पंचायत समिती गुहागर शिक्षण विभागाच्या माध्यमातून दिलेल्या सूचनानुसार सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडले‌. यावेळी ग्रामसेवक हरीश कुळये यांनीही उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. स्वीप अंतर्गत दिलेले सर्व उपक्रम यशस्वी केल्याबद्दल केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांनी सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले. Voting awareness program

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVoting awareness programगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.