8 ऑगस्टला मतदारकेंद्र निहाय मतदार याद्या मिळणार
गुहागर, ता. 09 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Election) ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मतदार (Voters) याद्या 18 जुलैला प्रसिध्द होणार आहेत. हरकती व सूचनांसाठी 22 जुलैपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर मतदारकेंद्र निहाय अंतिम मतदार (Voters) याद्या 8 ऑगस्टला प्रसिध्द केल्या जातील. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे. Voter lists on 8 August
महाराष्ट्रात 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका (Election) पावसाळ्यानंतर घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 13 जुलैला जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत आहे. त्यानंतर 18 जुलैला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी मतदार नोंदणी, नाव व अन्य माहितीमधील बदल यासाठी अभियान आयोजित केले होते. त्यानंतर 31 मे 2022 रोजी विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार याद्या निश्चित करण्यात आल्या. या याद्यांच पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार (Voters) याद्या म्हणून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर कोणाला हरकत किंवा सूचना द्यायची असेल तर 22 जुलैपर्यंत मुदत आहे. या कालावधीत आलेल्या सूचना व हरकतींचे निवारण 8 ऑगस्टपर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर मतदारकेंद्र (Polling station) निहाय मतदार याद्यांना प्रसिद्धी दिली जाणार आहे. Voter lists on 8 August