१४० बूथ केंद्र, १ लाख ९९७ मतदार, आबलोली, धोपावेत तपासणी नाके
गुहागर, ता. 05 : शिंदे– रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तालुक्यात १४० बूथ केंद्र, १ लाख ९९७ मतदार असून यासाठी गुहागर तालुक्यातील मतदार राजा सज्ज झाला आहे. तसेच आबलोली, धोपावे येथे तपासणी नाके असून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. तालुका प्रशासनाने याबाबत माहिती दिली. Voter king ready to vote


गुहागर तालुक्यात ४६ हजार ४१८ पुरुष तर ५४ हजार ५५५ स्त्री मतदार आहेत. मतदारांच्या मागणीनुसार प्रत्यक्ष घरातून झालेले मतदान 635 इतके झाले आहे. तालुक्यात मतदान जनजागृती अभियान कार्यक्रमही राबविण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, मंडळे यांनी याविषयी जनजागृती करुन मतदार राजाला मतदानाचे महत्व पटवून देऊन बहुसंख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. Voter king ready to vote

