पथनाट्याचे आयोजन; प्राथमिक शिक्षकांचा स्वयंस्फूर्तीने भव्य प्रतिसाद
गुहागर, ता. 07 : 264 गुहागर विधानसभा स्वीप उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची मतदार जनजागृती भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेशाने व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर चे रायचंद गळवे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. आर पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ते गुहागर तहसीलदार कार्यालय मैदान ते शृंगारतळी पेट्रोल पंप अशी भव्य बाईक काढून मतदार जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीचे नेतृत्व गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी केले. Voter awareness under sweep initiative
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कुळे, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मनोज पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, प्राथमिक शिक्षक समितीचे माजी तालुका सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, अपंग प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, तज्ञ मार्गदर्शक दिनेश जाक्कर, प्रताप देसले, लक्ष्मण लोहकरे, तुषार लोहार, विनोद कदम, नितीन काकडे, पंचायत समिती विषय शिक्षक वनाळे सर व तालुक्यातील सुमारे 180 शिक्षक बंधू भगिनी सहभागी झाले होते. Voter awareness under sweep initiative
त्यावेळी नवनियुक्त शिक्षण सेवक यांनी मतदार जनजागृती विषयक पथनाट्य सादर केले. त्यानंतर पालशेत हायस्कूल, पालशेत बाजारपेठ, मोडकागर, गुहागर एसटी स्टँड, गुहागर तहसीलदार कार्यालय, शृंगार तळी पेट्रोल पंप या दरम्यान प्राथमिक शिक्षकानी उस्फूर्तपणे बाईक रॅली आयोजित करून, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. पालशेत बाजारपेठ, गुहागर एसटी स्टँड व रहदारीच्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम सादर केले. Voter awareness under sweep initiative
उपस्थित नागरिक यांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब म्हणाले की, विधानसभा सार्वजनिक निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजवावा,.आपली लोकशाही बळकट करावी, मतदानाचा पवित्र हक्क बजावून, आपले कर्तव्य पूर्ण करावे. भारत सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे, मतदान करणे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. मतदार बाईक रॅलीमध्ये भाग घेणाऱ्या सर्व शिक्षकांना त्यांनी धन्यवाद दिले. त्यावेळी नितीन काकडे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बाईक रॅलीच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी रायचंद गळवे व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी प्रयत्न केले. पंचायत समिती शिक्षण विभागाअंतर्गत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन केल्याबद्दल गुहागर तालुक्यातील जनतेकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. Voter awareness under sweep initiative