निवडणूक साक्षरता मंच व नगरपालिकेच्या सहकार्याने देव, घैसास, कीर महाविद्यालयात
रत्नागिरी, ता. 30 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंच व नगरपालिकेच्या सहकार्याने महाविद्यालयात विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Voter Awareness Program in Ratnagiri
महाविद्यालयातील नवीन मतदार विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या पथनाट्य टीमने त्यांच्या सादरीकरणातून लोकशाही प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देते आणि उपस्थितांना हा अधिकार वापरण्याचे आणि लोकशाही मूल्यांना बळकट करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि मित्रांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहित केले. Voter Awareness Program in Ratnagiri
या कार्यक्रम प्रसंगी रत्नागिरी पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित चाळके, उत्तम पाटील, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, निवडणूक साक्षरता मंचाचे प्रमुख प्रा. विनय कलमकर व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. Voter Awareness Program in Ratnagiri