गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मुंढर येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्या श्री सिध्दीविनायक विद्यामंदिरमध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. हे उद्घाटन डाँ. विवेक नातू यांच्याहस्ते झाले. यावेळी मार्गदर्शक म्हणून सुरेंद्र वैद्य, सचिन विचारे संतोष अरमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. Vocational Training in Mundhar Vidyalaya

दहावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्यात सुट्टी असते. या विद्यार्थ्यांसाठी 24 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्लंबिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रीशियन, सुतारकाम, फिटींग, स्प्रे पेंटिंग इत्यादी शिकविण्यात आले. या संधी फायदा 40 विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करुन सहभागाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. Vocational Training in Mundhar Vidyalaya

या प्रशिक्षण कार्यक्रमाला चंद्रकांत चांदोरकर, विवेक भिडे, देवखेरकी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत साळवी, मंगेश गोरिवले, शंकर गलांडे, गणेश कुलकर्णी, विजय वेले, सुनिता गोखले, संदीप शिर्के, चंदन वसावे, दिलीप बडद, शंकर घाणेकर, विनोद सुर्वे, प्रसाद वैशंपायन, श्रीमती अश्विनी शिर्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पराग कदम यांनी केले. तर आभार अनंत साठे यांनी मानले. Vocational Training in Mundhar Vidyalaya
