पक्षप्रमुख वालम यांचे हस्ते तालुका जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ
गुहागर, ता. 14 : बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांचे कोकण दौरा मोठ्या जनजागृती मध्ये पार पडल्यानंतर आता पक्षप्रमुख अशोकदादा वालम रविवारी दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुहागर मध्ये एका मोठ्या मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत. गुहागर तालुका बळीराज सेना जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे शुभहस्ते शृंगारतळी येथे पार पडला. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली बळीराज सेना आयोजित व्यावसायिक कौशल्य विकास मार्गदर्शक मेळावा / शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू व पैठणी कार्यक्रम होणार आहे. Vocational Skill Guidance Camp at Guhagar
सदर मेळाव्याला तमाम नागरिकांनी व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, तालुका अध्यक्ष अरुण भुवड व सचिव ॲड.दिनेश कदम यांनी केले आहे. Vocational Skill Guidance Camp at Guhagar


दरम्यान बळीराज सेनेच्या या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक अशोकदादा वालम तसेच व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी लोकनेते शामराव पेजे कोकण आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.प्रकाश भांगरथ, पक्षाचे नेते सुरेश भायजे, प्रकाश तरळ, नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, युवा नेते ॲड.विनेश वालम, पाटपन्हाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच विजय अर्जुन तेलगडे व अन्य निमंत्रिक मान्यवर उपस्थितीत रहाणार आहेत. Vocational Skill Guidance Camp at Guhagar
सदरचा कार्यक्रम हा पालपेणे फाटा येथील भवानी सभागृह (मंगलकार्यालय) जानवले, ता. गुहागर जि.रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. सकाळी १० वाजल्या पासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी गुहागर विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शरद बोबले यांच्या मार्गदर्शन खाली सुरु आहे. Vocational Skill Guidance Camp at Guhagar