गुहागर, ता. 01 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने दि. 8 व 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पालघर, मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गोवा या कोकण प्रांतातील पदाधिकारी, नवीन सदस्य यांचा अभ्यास वर्ग परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती प्रतिष्ठान गोळवली संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे. कोकण प्रांत अध्यक्ष श्री. मानसिंग यादव व जिल्हाध्यक्ष रत्नागिरी श्री सचिन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा करण्यात येणार आहे. Visit of the office bearers of All India Consumer Panchayat

या दौऱ्यात कोकण प्रांत सचिव चंद्रकांत मांडवकर, कोकण प्रांत सहसचिव विकास ढवण, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रकाश सावर्डेकर, सहसचिव विलास सकपाळ, शिक्षण आयम प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी यांनी गुहागर, मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यांचा नुकताच दौरा करून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या व ज्येष्ठ सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच अभ्यास वर्गामध्ये होणाऱ्या विविध विषयांचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आव्हान करण्यात आले. Visit of the office bearers of All India Consumer Panchayat

यावेळी गुहागर तालुकाध्यक्ष श्री. गणेश धनावडे, दापोली तालुकाध्यक्ष संदेश राऊत, मंडणगड अध्यक्ष दिनेश साप्ते, खेड अध्यक्ष विजय येरुणकर यांनी आपल्या मनोगतात जास्तीत जास्त सदस्य उपस्थित राहतील, असे सांगितले. Visit of the office bearers of All India Consumer Panchayat
