संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विश्व समता कला-भुषण पुरस्कार शाहिर शाहिद खेरटकर यांना जाहीर करण्यात आले आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी सांयकाळी ७ वाजता शुभगंधा मंगल कार्यालय मयुरबाग लोवले येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. Vishwa Samata Award to Shahid Kheratkar


शाहिद खेरटकर हे कोकण प्रांतातील प्रतिभावंत व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ज्यांनी आपल्या काव्य, गायन आणि वत्कृत्वातून समतेचा विचार पेरणारे अनेक कार्यक्रम कोकण प्रांतात तसेच मुंबई व पुण्यात नाट्यगृहाच्या रंगमंचावर सादर केले. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कवी म्हणून आपली छाप पाडणारे निस्वार्थी समाज सेवक तसेच कोकणची समृद्ध लोककला जाखडी (कलगी तुरा) या लोक कलेच्या माध्यमातून गेली २५ वर्ष कलाविश्वात आपला आगळा वेगळा ठसा उमटवणारे लोकप्रिय शाहिर आणि छत्रपती शिवराय, शाहू, फूले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य झटवीणारे, थोड्याच दिवसात”ललकारी”हा कवितासंग्रह प्रकाशित करण्याचा निर्धार करणारे कवी, निवेदक,वक्ता,आणि सह्याद्री समाचार यूट्यूब चॅनलचे संस्थापक, संपादक, पत्रकार आणि खेड तालुक्यातील पंधरा गाव विभागातील पोसरे गावचे सुपुत्र शाहिर शाहिद खेरटकर यांना विश्व समता कलामंच लोवले, तालुका संगमेश्वर या संस्थेचा विश्व समता कला – भुषण हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला असून शाहिर शाहिद खेरटकर यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Vishwa Samata Award to Shahid Kheratkar