• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विशालगड मुक्ती संग्राम

by Guhagar News
July 9, 2024
in Articals
137 1
0
Vishalgad Mukti Sangram

विशाल गड

269
SHARES
769
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संभाजीराजेंसह जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांचा पुढाकार

Guhagar news :विशाळगड म्हटला कि पहिली आठवण येते ती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईची. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटून याच विशालगडावर आले होते. त्यामुळे बाजीप्रभु देशपांडे यांच्यासह त्यांच्या तुकडीतील मावळ्यांची स्वामी निष्ठा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी त्यांनी स्विकारलेले वीरमरण, विशालगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य या सर्व आठवणी विशालगड परिसरात गेल्यावर डोळ्यासमोरुन तरळुन जातात. मात्र आज हाच विशालगड नियोजनबध्द रितीने अतिक्रमण करुन टपऱ्या, कोंबड्यांची दुकाने, घरे उभारुन सौंदर्यहिन केला जात आहे. गेली 20 वर्ष हे सगळे सुरु आहे. त्यातुन शिवप्रेमींचा संताप वाढु लागला आहे. त्यातुनच विशालगड मुक्ती संग्रामाची हाक दिली गेली आहे. याचे नेतृत्त्व कोल्हापुरचे युवराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे करीत आहेत. Vishalgad Mukti Sangram

विशालगडावरील एका चौथऱ्यावर सरकारी मदतीतून सुमारे 3000 चौरस फुटाचे बांधकाम तेथे करण्यात आले. याच इमारतीचा आधार घेवून 2004 ते 2014 या काळात चक्क प्रधानमंत्री आवास योजनेतून ५० हजार ते 2 लाखापर्यंतचा निधी मिळवून घरे बांधण्यात आली. वन विभागाने या सर्वांना नोटिसा बजावल्या पण अतिक्रमणवाद्यांनी त्यावर स्टे आणवला. Vishalgad Mukti Sangram

Vishalgad Mukti Sangram
उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देताना शिवप्रेमी

गेली दहा वर्षे विविध संघटना हि सर्व अतिक्रमणे हटावीत यासाठी मोठा संघर्ष करत आहेत. गेल्या वर्षीही या संदर्भात मोठे आंदोलन छेडले गेले. त्यातून विषय कोर्टात गेला. या केसच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या संकटांशी झुंजत अनेक सरकारी कागदपत्रे जमा केली आहेत. त्यात अनेक सातबाराचे कागद, पुरातत्व विभागाची पत्रे आणि कागद, विविध खात्यांतील सरकारी नोंदी अश्या कित्येक गोष्टी जमा करून कोर्टात पुरावे म्हणून सादर केल्या गेल्या आहेत. विशालगड ऐतिहासिक हेरिटेज असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे येथील जमीनी कशा बळकावल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी पुरातत्व खात्याकडून परवानग्या कशा मिळाल्या. बांधकामांना वरदहस्त कोणी दिला. असे अनेक प्रश्र्न न्यायालयासमोर या संघटनांनी उभे केले आहेत. Vishalgad Mukti Sangram

दरम्यानच्या काळात मुंबई बॉम्बब्लॉस्ट केस मधील आरोपी यासिन भटकळ हा सुद्धा पोलिसांची नजर चुकवून आठ दिवस विशालगडावर राहिला होता अशी नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी दहशतवादी तर येऊन रहात नाही ना याची ही शहानिशा झाली पाहिजे. अशी मागणी या संघटनांनी न्यायालयात केली आहे. Vishalgad Mukti Sangram

Vishalgad Mukti Sangram
विशालगडाच्या पायथ्याशी जमलेल्या शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे

या पार्श्र्वभुमीवर किल्ले विशाळगड त्वरित अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी करीत रविवारी (ता. 7 जुलै) शिवप्रेमी भर पावसात रस्त्यावर उतरले होते. महाआरती केल्यानंतर विशाळगड अतिक्रमणावरून न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. Vishalgad Mukti Sangram

यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की “किल्ल्यावर जवळजवळ १५६ अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यात तीन मजली मशीद आहे तसेच मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे. पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरचे राजगडावरचे एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात, मग ही अतिक्रमणे झाली कशी ? ही सगळी अतिक्रमणं त्वरित पाडली जावीत अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारला मागणी आहे.” Vishalgad Mukti Sangram

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैय्या बेग यांनी यावेळी सरकारने गड किल्ले संवर्धनासाठी समितीला दिलेल्या ८०० कोटी रुपयांच्या निधीतून काय कामे झाली याचा हिशेब द्यावा आणि त्या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा अशी मागणी केली. Vishalgad Mukti Sangram

यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांना शिवनिष्ठ बांदल घराण्यातील श्री अनिकेत बांदल, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनीही संबोधित केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते महेश विभुते, मानसिंग कदम, विशाल पाटील, आकाश पवार, ओंकार कारंडे, रुपेश वारंगे, तुषार पाटील तसेच सकल हिंदू समाज व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, कोल्हापूर जिल्हा समन्वयक अनिरुध्द कोल्हापुरे, दीपक देसाई, कुंदन पाटील, गजानन तोडकर, अनिल दिंडे, आनंदराव पवळ, सोहम कुऱ्हाडे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून हजारो शिवभक्त आले होते. Vishalgad Mukti Sangram

Vishalgad Mukti Sangram
विशालगड मुक्तीसाठी आयोजीत बैठकीत ठरलेल्या निर्णयाची माहिती देताना युवराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापुरमध्ये युवराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील विशालगडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत विशाळगडावर जमण्याचा दिवस निश्चित करण्यात आला. पन्हाळगडाचा वेढा भेदून १३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले होते. याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून विशाळगडाला अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी राज्यभरातून सर्व शिवभक्तांनी शनिवार, दि.१३ जुलै २०२४ रोजी दुपारी ०२ वाजता मोठ्या संख्येने विशाळगडावर जमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Vishalgad Mukti Sangram

Vishalgad Mukti Sangram
विशालगड मुक्तीसाठी आयोजीत बैठकीत ठरलेल्या निर्णयाची माहिती देताना युवराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

शिरीष मोरे आणि संभाजीराजे हे दोन मातब्बर या लढ्यात उतरल्याने आता विशालगड मुक्ती संग्रामाचा लढा आणखी तीव्र होणार हे निश्चित आहे. मात्र या दोघांनी आंदोलने करताना समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. Vishalgad Mukti Sangram

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVishalgad Mukti Sangramगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.