• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच 

by Guhagar News
June 7, 2023
in Bharat
101 1
0
अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच 
199
SHARES
569
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

80 विद्यार्थींनींवर केला विषप्रयोग

गुहागर, ता. 07 : अफगानिस्तानमध्ये 2021 मध्ये तालिबान सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत. ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना कमी करण्यात आले आहे. त्यातच आता अफगानिस्तानच्या सर-ए-पुल प्रांतात एक धक्कादायक घटना घडली आहे. Violence against women in Afghanistan continues

शिक्षणाच्या प्रांत विभागाचे प्रमुख मोहम्मद रहमानी यांनी सांगितलं की, सर-ए-पुल प्रांतातील संगचरक जिल्ह्यात पहिले ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थींनींवर विषप्रयोग करण्यात आला. दोन शाळांमधील जवळपास तब्बल 80 विद्यार्थींनींना विष दिल्याची ही घटना आहे. यामध्ये नसवान-ए-कबोद आब या शाळेतील 60 तर नसवान-ए-फैजाबाद 17 मुलींवर हा विषप्रयोग करण्यात आला आहे. Violence against women in Afghanistan continues

त्यांनी पुढे असं देखील सांगितलं की, या दोन्ही शाळा जवळ-जवळच आहेत. तर या मुलींना एका मागे एक असे लक्ष्य केले जात आहे. या मुलींना रूग्णालायात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. तर वैयक्तिक वादातून या शाळांना असे नुकसान पोहचवण्याचा हा प्रयत्न असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Violence against women in Afghanistan continues

2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. कारण या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत. ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना कमी करण्यात आले आहे.  या अगोदर अफगानिस्तानमध्ये 2015 मध्ये अशाच प्रकारे शालेय मुलींना विष देण्यात आलं होत. मात्र त्यावेळी तेथे तालिबानची सत्ता नव्हती. त्यावेळे तब्बल 600 शालेय मुलींवर विष प्रयोग करण्यात आला होता. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच घटना ईराणमध्ये देखील घडली होती. त्यानंतर आता पुन्हा हा प्रकार अफगानिस्तानात समोर आला आहे. Violence against women in Afghanistan continues

Tags: Abuse of womenAfghanistanGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarViolence against women in Afghanistan continuesगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहिलांवर अत्याचारलोकल न्युज
Share80SendTweet50
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.