मांडली पाण्याची कैफियत; जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री दिला भरघोष निधी
गुहागर ता. 31 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिल्यानंतर जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे, असे चित्र पहावयास मिळते. या पार्श्वभुमीवर धोपीवे ग्रामस्थांनी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत पाण्याची कैफित मांडली व रस्त्याच्या कामावरील बंदी उठविण्याची मागणी करत एकमताने पालकमंत्री सामंत साहेब व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा ठराव करत आश्वासन दिले. Villagers of Dhopave support Shiv Sena party


धोपावे गाव विकासापासुन अनेकवर्षे मागे गेला होता. यामध्ये बदल व्हावा आणि तो शिवसेना पक्ष व पालकमंत्री सामंतच करु शकतात. असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पाठींबा दर्शविला आहे. यावेळी विविध कामांची मागणी तसेच प्रामुख्याने पश्चिमेच्या किनारपट्टीच्या बाजुने संरक्षक भिंत बांधणे व रस्ता तयार करणे इत्यादी विकास कामांची मागणी केली. या पाठींब्याबाबत मत व्यक्त करतांना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी त्यांचा विश्वास सार्थक विकासकामे लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातुन पुर्ण करु असे आश्वासन दिले. कामाची चिंता करु नका आम्ही विकासकामांसाठीच प्रयत्नशील आहोत असे सांगितले. Villagers of Dhopave support Shiv Sena party


यावेळी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, सचिव श्री संतोष आग्रे, उपतालुकाप्रमुख राजेश धामणस्कर, उपविभागप्रमुख नरेश पवार व उमेश किल्लेकर सह नवनियुक्त शाखाप्रमुख श्री रोहीदास जाधव, उपशाखाप्रमुख व भिकाजी संसारे उपस्थित होते. Villagers of Dhopave support Shiv Sena party

