• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा

by Mayuresh Patnakar
September 25, 2022
in Guhagar
16 0
0
Villagers demand from administration

गुहागर वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायत

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्र्वर ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

गुहागर, ता. 25 : वेळणेश्र्वर महसुली गाव मोठा आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये वाडदई गाव येतो. शिवाय ब दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून वेळणेश्र्वरला ओळखले जाते. त्यामुळे कामाच्या निपटाऱ्यासह विकासाला गती मिळण्यासाठी वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास घाणेकर, माजी सरपंच संदीप ठाकुर यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. Villagers demand from administration

वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीमध्ये सौ. जाधव या पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्त होत्या. मात्र एक वर्षांपूर्वी त्यांची प्रशासकीय बदली तालुक्यातील पालपेणे ग्रामपंचायतीमध्ये झाली. ही बदली झाल्यावर प्रशासनाने सौ. जाधव यांच्याकडे वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीचा प्रभार दिला. त्यामुळे आता सौ. जाधव बुधवार व शुक्रवार अशा दोन दिवस वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीमध्ये असतात. Villagers demand from administration

वेळणेश्र्वर महसुली गावाची लोकसंख्या शासकीय नोंदी प्रमाणे 3700 आहे. गेल्या 10 वर्षात इथला पर्यटन व्यवसाय वाढला आहे. वेळणेश्र्वर हे ब दर्जाचे पर्यटन स्थळ असून येथे पावसाळ्यानंतर पर्यटकांची वर्दळ सुरु होते. शिवाय एक अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाले आहे. त्यामुळे आज गावाची लोकसंख्या 5 हजारपेक्षा जास्त आहे. Villagers demand from administration

जिल्हा परिषदेच्या ३ शाळा, १ हायस्कुल, १ अभियांत्रिकी महाविद्यालय या मधील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना लागणारे दाखले देण्याचे काम ग्रामविकास अधिकाऱ्यांना करावे लागते. विविध विकास कामांचे प्रस्ताव करणे, निविदा काढणे, शासनाकडे कामांचा पाठपुरावा करणे, केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, शेतकरी बागायदार यांच्या योजना ही सर्व कामे एक ग्रामविकास अधिकारी केवळ दोन दिवसात करु शकत नाही. ग्रामपंचायतीचा दाखला मिळविण्यासाठी ग्रामस्थांना फेऱ्या माराव्या लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करुन प्रशासनाने पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास घाणेकर, माजी सरपंच संदीप ठाकुर, गावाच्या समन्वय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे. Villagers demand from administration

याबाबतचे एक निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राऊत यांच्याकडे करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास मंत्रालयालाही निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर दिलीप गोखले, नितीन पोळेकर, सचिन पोळेकर, रविंद्र पोळेकर, शिवराम गुरव, प्रविण कनगुटकर, सौ. श्रावणी कनगुटकर, अजित पिंपरकर, उदय गोखले, दिलीप इतापे, रमेश गोणबरे, सुरेश गोणबरे, विलास घाणेकर, सौ. रुपारी मोरे, व संदीप ठाकूर यांच्या सह्या आहेत.  Villagers demand from administration

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVillagers demand from administrationगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.