गुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळीवाडी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गवळीवाडीतील मुंबई आणि गाव असे ७० मतदान होते. Villagers’ boycott of voting


सडेजांभारी गवळीवाडीतील ७० मतदान पैकी ५०% मतदार नोकरी निमित्त, कामानिमित्त मुंबई येथे राहतात. मतदान वगळता गावी सडेजांभारी गवळीवाडीतील ५०% मतदार रहातात. गवळी वाडी मधील ग्रामस्थांची मागणी अशी होती की, देवळासाठी जो पक्ष आंम्हाला मदत करील त्याच पक्षाच्या उमेदवाराला आमचे मतदान होईल, असा ठाम निर्धार केल्याने व चर्चा सफल न झाल्याने सडेजांभारी मधील गवळी वाडीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला, अशी माहिती ग्रामस्थांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी प्रतिनीधींशी बोलताना दिली. Villagers’ boycott of voting