कलशारोहन सोहळा प.पु गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य मठाधीपती प.पु उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर येथील ग्रामदेवता श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार व नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन सोहळा प.पु गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य मठाधीपती प.पु उल्हासगिरी महाराज (ओणी- राजापुर) यांचे हस्ते होणार आहे. हा सोहळ्यानिमित्त शुक्रवार दि २८ फेब्रुवारी ते सोमवार दि. ३ मार्च २०२५ या चार दिवशीय कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. Village deity idol dedication ceremony at Adur


यानिमित्त शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा. वास्तुशांत, श्री गणेश पूजन, नांदीश्राद्धांत, पुण्याहवाचन, आचार्यकर्म, देवतापूजन, होमहवन, पूर्णाहुती, कलश आगमन, पूजन, जलाधिवास, शयन, सायंकाळी ७.३० वा. श्री विठ्ठलाईदेवी महिला प्रासादिक भजन मंडळ अडूर, रात्रौ ०८.३० वा. श्री बंड्यामारुती महिला प्रासादिक भजन मंडळ अडूर यांचे सुस्वर भजन होईल.
शनिवार दि. १ मार्च रोजी सकाळी ७ वा. श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, आचार्यकर्म, ब्रम्हादीदेवता मंडल स्थापना, होमहवन, सकाळी ७.३० ते १० वा. अडूर सीमा ते मंदिरापर्यंत मिरवणुकीने देवतांचे आगमन, सकाळी ११.३० वा. कलशारोहन प.पु गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य मठाधीपती प.पु उल्हासगिरी महाराज (ओणी- राजापुर) यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. धान्यवास व देवशयन, दुपारी १.३० वा. महाप्रसाद. रविवार दि. २ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. सनईवादन, घंटानाद, नविन देवतांची प्राणप्रतिष्ठापणा, दुपारी १.३० वा. प्रार्थना व महाआरती, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. देवीचा गोंधळ, सायंकाळी ७.३० वा. श्री.विठ्ठलाईदेवी प्रासादिक भजन मंडळ अडूर यांचे भजन, रात्रौ ८.३० वा. श्री.पिंपळेश्वर गुरुदत महिला प्रासादिक मंडळ अडूर यांचे भजन, रात्रौ ९.३० वा. श्री गंगामाता प्रासादिक भजन मंडळ अडूर यांचे भजन संपन्न होईल.
सोमवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ८ वा. देवतांची पूजा, सकाळी १० वा. श्री.सत्यनारायण महापूजा, दुपारी महाभंडारा, सायंकाळी ७.३० वा. श्री.स्वरसाधना महिला प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर, रात्रौ ९ वा. श्री.सुंकाईदेवी जुनी तीन गावकी नमन अडूर, रात्रौ १० वा. जिल्हास्तरीय नमन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली, संगमेश्वर यांचे नमन पार पडणार आहे. Village deity idol dedication ceremony at Adur