• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 May 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नामवंत उद्योजक विजय कदम यांचा भाजप मध्ये प्रवेश

by Manoj Bavdhankar
May 19, 2026
in Politics
148 2
0
Vijay Kadam Joins the BJP
292
SHARES
833
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : नामवंत उद्योजक विजय उर्फ अण्णा कदम यांनी आमदार श्री. प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी खास स्वागत केले. Vijay Kadam Joins the BJP

शतप्रतिशत भाजप ही घोषणा घेऊन आमदार श्री. प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे खास लक्ष देण्याचे ठरवले असून चिपळुणात नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार त्यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी नामवंत उद्योजक श्री. विजय उर्फ अण्णा कदम यांनी भाजप पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांचे खास स्वागत केले. विजय कदम यांना योग्य मानसन्मान मिळेल व त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्की उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Vijay Kadam Joins the BJP

यावेळी चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनीही श्री. कदम यांच्या प्रवेशामुळे भाजप मजबूत होणार, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण शहर प्रभारी विजय चितळे, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य अभय चितळे, बँकिंग सेलचे संयोजक रत्नदीप देवळेकर, पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक नरेंद्र बेलवलकर, चिपळूण शहर उपाध्यक्ष निनाद आवटी, मीडिया जिल्हा संयोजक रुपेश आवले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, शक्तिकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. Vijay Kadam Joins the BJP

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVijay Kadam Joins the BJPटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.