• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन

by Mayuresh Patnakar
July 24, 2023
in Guhagar
123 1
0
Veteran colorist Jayant Savarkar No More
241
SHARES
689
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : 100 हून अधिक मराठी नाटके, 30 हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी मालिका व चित्रपट यामधून रंगदेवतेची आयुष्यभर सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते  जयंत सावरकर यांचे सोमवारी (ता.24) निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.  गेले 15 दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२५ जुलै) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Veteran colorist Jayant Savarkar No More

गुहागर, ता. 24 : 100 हून अधिक मराठी नाटके, 30 हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी मालिका व चित्रपट यामधून रंगदेवतेची आयुष्यभर सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते  जयंत सावरकर यांचे सोमवारी (ता.24) निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.  गेले 15 दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२५ जुलै) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Veteran colorist Jayant Savarkar No More  जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या) सारख्या  मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या तळीराम (एकच प्याला), अंतु बर्वा या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने गाजवला. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी  नोकरी सांभाळून, बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केलं.  मुंबई मराठी साहित्य संघात पडेल ते काम करणारा ते साहित्य संघाचे विश्वस्त असा प्रवास केला. एका नाटकाची निर्मिती देखील केली. Veteran colorist Jayant Savarkar No More   जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम केलं आहे.   जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.  त्यांची निवड बिनविरोध झाली होती हे विशेष. Veteran colorist Jayant Savarkar No More   सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. अनेक मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Veteran colorist Jayant Savarkar No More

जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या) सारख्या  मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या तळीराम (एकच प्याला), अंतु बर्वा या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने गाजवला. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी  नोकरी सांभाळून, बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केलं.  मुंबई मराठी साहित्य संघात पडेल ते काम करणारा ते साहित्य संघाचे विश्वस्त असा प्रवास केला. एका नाटकाची निर्मिती देखील केली. Veteran colorist Jayant Savarkar No More

जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम केलं आहे.   जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.  त्यांची निवड बिनविरोध झाली होती हे विशेष. Veteran colorist Jayant Savarkar No More

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. अनेक मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Veteran colorist Jayant Savarkar No More

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVeteran colorist Jayant Savarkar No Moreगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.