• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हयाच्या विकासाचा आलेख उंचावला

by Guhagar News
May 20, 2026
in Ratnagiri
47 1
0
92
SHARES
264
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा कोषागारच्या तिजोरीतून विक्रमी आर्थिक उलाढाल

रत्नागिरी, ता. 20 : जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) तब्बल ३३४ कोटी ८२ लाख ६४ हजार ७३८ रुपयांची उच्चाकी आर्थिक उलाढाल केली आहे. जिल्ह्याच्या प्रगतीची चक्रे गतिमान ठेवण्यासाठी आणि प्रत्येक शासकीय यंत्रणेला बळ देण्यासाठी या अवाढव्य निधीचे अत्यंत चोख आणि पारदर्शक वितरण करण्यात आले. या आर्थिक शिस्तीमुळे रत्नागिरीच्या प्रगतीला मोठी गती मिळाली आहे. Very accurate and transparent distribution of funds

जिल्हा प्रशासनाने यंदा जनतेच्या थेट आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या घटकांवर सर्वाधिक भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाला सर्वोच्च प्राधान्य देत १५९ कोटी ३७ लाख ४६ हजार २१६ रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला. वैद्यकीय सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यास, औषध पुरवठा सुरळीत करण्यास आणि जिल्हा रुग्णालयांच्या आधुनिकीकरणाला गती मिळाली आहे. या भरीव तरतुदीमुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या बरोबरीनेच जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्थ चोख ठेवणाऱ्या गृहविभागावर (पोलीस प्रशासन) मोठा विश्वास दाखवण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, लोकशाहीच्या उत्सवासाठी कोटींची उलाढाल भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या कोकणात रस्ते आणि इमारतींचे जाळे मजबूत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठा आर्थिक बळ देण्यात आला आहे. या विभागामार्फत ३८ कोटी ६७ लाख ९७ लाख २३८ रुपयांची उलाढाल झाली आहे. Very accurate and transparent distribution of funds

अनेक प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळाली आहे. याच आर्थिक वर्षात जिल्ह्यात पार पडलेल्या विविध निवडणुकांचा खर्चही लक्षणीय ठरला, लोकशाहीचा हा महाउत्सव शांततेत, निर्भयपणे आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेवर ४४ कोटी ५६ लाख १३ हजार ७६९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला, जिल्हा कोषागार कार्यालयाचा हा आर्थिक ताळेबंद जिल्ह्याला समृद्धीकडे नेणारा माईलस्टोन ठरणार आहे. Very accurate and transparent distribution of funds

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVery accurate and transparent distribution of fundsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.