बचत समुहाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प – सरपंच मंगेश सोलकर
गुहागर, ता.15 : तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात महिला बचत समुहाच्या माध्यमातून गांडूळ खताचे प्रकल्प उभारण्याचा संकल्प सरपंच मंगेश सोलकर यांनी व्यक्त केला. बचत समुहाच्या आयोजित केलेल्या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खामशेत व पारदळेवाडी येथील सूमारे १२५ महिला उपस्थित होत्या. Vermicompost project at Khamshet
सरपंच मंगेश सोलकर म्हणाले की, ग्रामपंचायत खामशेतच्या कार्यक्षेत्रात असलेल्या समुहाच्या माध्यमातून अनेक छोटे उद्योग उभारून गावातच रोजगाराची संधी उपलब्ध होवून महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. हाच धागा धरून आपण हळूहळू सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे वळले पाहिजे. मात्र यासाठी सेंद्रिय खत म्हणून गांडूळ खताचा वापर करून भाजीपाला, फळबागा उभ्या केल्या तर चांगल्या प्रकारे आपण सेंद्रिय फळे व भाजीपाला उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून आमच्या बचत समुहाने करावयाच्या गांडूळखत प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सहकार्य आपल्याला राहील, असेही त्यांनी बचत समुहाला आश्वस्त केले. Vermicompost project at Khamshet

यावेळी कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांनी गांडूळ खत प्रकल्प, नॅडेप बाबत नरेगा मधून लाभ देण्यात येईल, अशी माहिती दिली. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी गांडूळ खत प्रकल्पाबाबत उत्तम प्रकारचे तांत्रिक सहकार्य व मार्गदर्शन पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने करण्यात येईल, असे आवर्जून सांगितले. जिवनोन्नती अभियानाच्या दुर्वा ओक यांनी छोटे प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले. Vermicompost project at Khamshet
यावेळी उपसरपंच विष्णू पारदळे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा माचीवले, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या दुर्वा ओक, ग्रामसेवक मोहिरे, सी. आर. पी. जान्हवी सोलकर हे उपस्थित होते. व खामशेत व पारदळेवाडी येथील सूमारे १२५ महिला उपस्थित होत्या. Vermicompost project at Khamshet

