डॉ. दाभोळे; युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती विचारणा
गुहागर, ता. 20 : युवासेनाचे कार्यकर्त्यांनी व्हेंटिलेटर मशिन क्रियान्वित करणे, परिचारिका विभाग कोरोना कक्षाजवळ स्थापन करावा या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वैदयकिय अधिक्षक डॉ. जयंत दाभोळे यांची भेट घेतली. त्यावेळी तांत्रिक गोष्टींमुळे ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर मशिन कार्यरत झालेले नाही. अशी माहिती वैदयकिय अधिक्षक डॉ. जयंत दाभोळे यांनी दिली.
On Tuesday 20th May, Yuva Sena activists meet Medical Superintendent Dr. Jayant Dabhole to discuss activating the ventilator machine and the nurse room, which should be set up near the Corona department. On this Subject Dr. Dabhol told, the ventilator machine in the rural hospital was not working due to technical issues.
गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशिन उपलब्ध झाले आहे. मात्र अद्याप हे मशीन क्रियान्वित का झालेले नाही. तसेच रुग्णालयातील परिचारिका विभाग कोरोना कक्षापासून दूर आहे. त्यामुळे ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांचे निरिक्षण करण्यासाठी तेथे परिचारिकाच नसतात. अन्य रुग्णांची तब्येत अचानक बिघडली तर कक्षाबाहेर थांबलेल्या नातेवाईकांना परिचारीकांना बोलावण्यासाठी धावपळ करावी लागते. हे दोन मुद्दे घेवून युवासेना तालुका प्रमुख अमरदिप परचुरे, युवासेना शहर प्रमुख राकेश साखरकर, शाखा प्रमुख कल्पेश बागकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे आदेश मोरे, ऋषी कचरेकर आणि प्रतीक साखरकर यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ. जयंत दाभोळे यांची भेट घेतली.
व्हेंटिलेटरच्या प्रश्र्नाला उत्तर देताना डॉ. दाभोळे म्हणाले की, हे मशीन उपलब्ध झाले आहे. मात्र हे मशीन सुरु करण्यासाठी केवळ ऑक्सिजन सिलेंडरला पाईप जोडून भागत नाही. तर स्वतंत्र उच्च दाबाची ऑक्सिजन वाहून नेणारी पाईप लाईन आवश्यक असते. ही पाईपलाईन बसविण्यासाठी वैद्यक विभागातील ऑक्सिजन पुरवठ्याचे काम करणाऱ्या अभियंत्यांची गरज असते. त्यासंदर्भात आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पत्रव्यवहार करताना आणखी ५ व्हेंटिलेटर जोडता येतील अशी पाईप लाईन बसविण्यास सांगितले आहे. त्यानुसार अभियंत्याने येवून पहाणी केली आहे. आता जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पुढील कार्यवाही झाल्यावर हे काम पूर्ण होईल.
परिचारिका कक्षाबाबत डॉ. दाभोळे म्हणाले की, थेट कोरोना विभागात परिचारिका कक्ष उभारणे थोडे धोक्याचे आहे. तरीही कोरोना विभागाजवळ स्वतंत्र खोलीत परिचारीकांची व्यवस्था करणे शक्य आहे. त्याबाबतची कार्यवाही करता येईल.
यावेळी पाईप लाईन बसविण्यासाठी कींवा परिचारिका कक्ष बदलण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर हक्काने सांगा. युवासेनेचे कार्यकर्ते ही कामे करण्यासाठी आपल्याला मदत करतील. असे आश्र्वासन डॉ. दाभोळेंना दिले.

