• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत भरारी

by Mayuresh Patnakar
August 13, 2026
in Guhagar
67 1
2
Velneshwar students excel in sports competition
132
SHARES
378
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेदिका सकपाळची विद्यापीठ संघात निवड

गुहागर, ता. 13 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरच्या मुला-मुलींच्या टेबल टेनिस संघांनी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. Velneshwar students excel in sports competition

मुलींच्या संघाने स्पर्धेत दमदार कामगिरी करताना पहिल्या सामन्यात ज्ञानदीप कॉलेज, खेड संघाचा ३-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत गोगटे कॉलेज, रत्नागिरी विरुद्ध रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात वेळणेश्वर अभियांत्रिकी संघाने ३-२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात डिबीजे कॉलेज, चिपळूण संघाकडून पराभव झाला. त्यामुळे मुलींच्या संघाने झोनल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या संघात महाविद्यालयातील वेदिका सकपाळ, प्रेरणा जाधव, तन्वी चव्हाण, वेदश्री चव्हाण आणि दिशा केरकर यांनी सहभाग घेतला. यातील वेदिका सकपाळ हिची कोकण विभागाच्या अंतिम ५ सदस्यीय विद्यापीठस्तरीय संघात निवड झाली आहे. हा संघ ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान NKTT कॉलेज, ठाणे येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. Velneshwar students excel in sports competition

मुलांच्याही संघाने स्पर्धेत दमदार कामगिरी करताना स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ज्ञानदीप कॉलेज, खेड संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत गोगटे कॉलेज, रत्नागिरी संघाकडून पराभव झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात लांजा कॉलेज संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे  मुलांच्या संघाने झोनल स्पर्धेत चौथे स्थान मिळविले. मुलांच्या संघात राज खडपेकर, पार्थ वाजे, गौरव दळवी, सचिन पाष्टे आणि ओम यादव यांनी सहभाग घेतला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राज खडपेकर याची कोकण विभागाचे विद्यापीठस्तरीय प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. Velneshwar students excel in sports competition

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार, विविध विभागांचे प्रमुख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.औदुंबर पाटकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून विद्यापीठस्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या वेदिका सकपाळ आणि राज खडपेकर यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या सहभागासाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रयत्नांना या कामगिरीमुळे बळ मिळाले आहे. Velneshwar students excel in sports competition

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVelneshwar students excel in sports competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.