• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महर्षी परशुराम अभियांत्रिकी ठरेल प्रशंसनीय महाविद्यालय

by Mayuresh Patnakar
October 8, 2022
in Guhagar
20 0
1
Velneshwar College was chosen by Asia Today
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्यपालांच्या हस्ते  गौरव, एशिया टुडे संस्थेने केली निवड

गुहागर, ता. 8 :  तालुक्यातील वेळणेश्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला (Maharshi parshuram college of engineering) एशिया टुडे (Asia today) ने  Most Admired Engineering College In Maharashtra (महाराष्ट्रातील सर्वात प्रशंसनीय अभियांत्रिकी महाविद्यालय) या पुरस्काराने  गौरविले. हा पुरस्कार राज्यपाल श्री. भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका डॉ. कीर्ती आगाशे यांनी स्वीकारला. Velneshwar College was chosen by Asia Today

7 आँक्टोबरला मुंबईत एशिया टुडे या संस्थेच्या Pride Of Nation Awards 2022  या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले आणि विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.  ग्रामीण भागात  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन अभियांत्रिकी  शिक्षणाची संधी  विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची (Maharshi parshuram college of engineering) निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली, असल्याचे एशिया टुडे (Asia today) ने सांगितले. Velneshwar College was chosen by Asia Today

रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) यांनी २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली.  २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. अत्यंत कमी कालावधीत नॅक चे मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्वात तरुण महाविद्यालय म्हणजे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. Velneshwar College was chosen by Asia Today

विद्या प्रसारक मंडळाने कोविड महामारीमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात ‘कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना’ 2020 पासून सुरू केली.  तसेच विद्या प्रसारक मंडळाच्या मदतीने प्रथम आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले. Velneshwar College was chosen by Asia Today

भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिक महाविद्यालयात येऊन नियमित केलेले मार्गदर्शन इत्यादी योजना विद्यार्थ्यासाठी महाविद्यालय राबवत आहे. आभासी प्रयोगशाळेमधुन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावे यासाठी काँलेज आँफ इंजिनिअरींग पूणे, आय.आय.टी., अशा नामवंत संस्थांबरोबर करार केले आहेत. इस्त्रो, भेल, सारख्या मोठ्या प्रकल्पात औद्योगिक भेटीसाठी विद्यार्थ्यांना नेले जाते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रतिकृती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या सर्व उपक्रमांतून विद्यार्थ्यांची नवनिर्माण क्षमता वाढविणे, उत्तम अभियंता बनविणे, उत्तम नागरिक बनविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करते. यामुळेच हे महाविद्यालय पुरस्कारासाठी पात्र ठरले. अशी माहिती संस्था व महाविद्यालय समन्वयक ऋषिकेश गोखले यांनी दिली. Velneshwar College was chosen by Asia Today

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिंक करा.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 30 ते 60 हजाराची फी सवलत

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव

Tags: Asia todayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharshi parshuram college of engineeringMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVelneshwar College was chosen by Asia Todayगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.