हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल- मंत्री मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी, ता. 31 : १०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा, याकरिता भागोजीशेठ कीर यांनी हे पतितपावन मंदिर उभारले. या मंदिरात वीर सावरकरांनी मंदिरात सहभोजन सुरू केले. या दोघांनाही अभिवादन करतो. आजचे हे राजकीय व्यासपीठ नव्हे पण हा हिंदुत्वाचा कार्यक्रम आहे. वीर सावरकरांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतमातेला परकीय शक्तीपासून मुक्त करेन अशी शपथ घेतली. कारण त्याशिवाय भारतात हिंदुराष्ट्राची स्थापना होणार नाही, हे त्यांना माहिती होते. त्यांनी मोठा त्याग, तपस्या, लढाई केली. भारताला हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची त्यांची हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे, भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य , रोजगार उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri

महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताहात आज शोभायात्रा व सहभोजनाने सांगता झाली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजप-सेना सरकार स्थापन
महाविकास आघाडीने तुष्टीकरणाचे राजकारण केले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वासाठी एकत्र येत, स्वा. सावरकरांची प्रेरणा घेत भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच ही नैसर्गिक युती अनेक वर्षे टिकली. अनैसर्गिक युती पसंत पडली नाही. हिंदुत्व मानणाऱ्यांना एकत्र यावं लागेल. कुटुंबात एखादा मुद्द्यावर वादविवाद होऊ शकतो. पण असे भावनिक आवाहन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri

भाजप-सेना सरकार का स्थापन झाले याबाबत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व महत्त्वाची खाती होती, जे कधीही जिंकू शकत होते. परंतु २० मंत्र्यांनी सरकार सोडले आणि युती केली. यामागे स्वा. सावरकरांची प्रेरणा होती, हिंदुत्वाची कल्पना होती. रत्नागिरी हे टिळकांचे जन्मस्थान आणि वीर सावरकरांचे येथे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यांनी आपले सर्वस्व भारतीय संस्कृती रक्षण, हिंदुत्वासाठी, राष्ट्रासाठी वाहिले. आज त्यांचा आत्माही इथेच कुठेतरी फिरत असेल. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आज मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी आले आहेत. त्यांच्या मनात त्याग, तपस्या, अर्पणभाव आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण करावे व पुन्हा अखंड भारत करावा. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावरकर विचार जागरण सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड म्हणाले की, २१ ते २८ मे या कालावधीत राज्यात पाच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. रत्नागिरीमध्ये रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्पे, दुचाकी फेरी, शोभायात्रा, नाट्यप्रयोग, संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri
या वेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वाट्टेल त्या पद्धतीने, खालच्या स्तरावरून टीका केली गेली. ज्यांना स्वातंत्र्यवीर कळले नाहीत, त्यांचा इतिहास कधी वाचला नाही त्यांनी सावरकरांचे नावसुद्धा घेणे निषेधार्थ आहे. रत्नागिरीतही सोशल मीडियावरून चांगल्या कामाची बदनामी करत चुकीचे संदेश व्हायरल करणाऱ्या शक्तींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांनी तंबी दिली. अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे नाही, नाहीतर त्या वाढतात, असेही ते म्हणाले. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri

मंत्री सामंत म्हणाले की, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची पहिली आरती वीर सावरकरांनी लिहीली. हा इतिहास लोक विसरू लागले आहेत. त्या सावरकरांची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला, याबद्दल अभिनंदन. दहा महिन्यांपूर्वी राजकीय बदल झाला आणि शिंदे- फडणवीस सरकाराने इतिहासात प्रथमच २८ मे सावरकरांची जयंती हा सावरकर गौरव दिन म्हणून साजरा होत आहे. पुढच्या पिढीला सावरकरांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो त्यांचा करेक्ट करण्याचे काम केले पाहिजे. मी करेक्ट हा शब्द वापरला कारण देशात सावरकरांच्या बदनामीची मोहीम आखली जात आहे. पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट असो आमच्यात कधी तंटा होत नाही. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri
रत्नागिरीकर सावरकरांच्या विचाराने प्रेरित असल्यामुळे देशाबद्दलचे प्रेम व्यक्त होते. हा उत्सव ३६५ दिवस झाला पाहिजे. सावरकरांचा विचार राज्यात पोहोचला पाहिजे याकरिता मोहीम उघडण्याची गरज आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो. आम्ही काही लोकांना आवाहन केले आणि मधुसूदन कालेलकर लिखित सागरा प्राण तळमळला हे नाटक ३ जूनपासून महाराष्ट्रात दाखवले जाणार आहे. वि. दा. सावरकर स्मारक मुंबईत झाले व वीस वर्षांपूर्वी सावरकर नाट्यगृह रत्नागिरीत झाले. त्या वेळी नामकरणाचे धाडस उमेश शेट्ये यांनी केले. आज ते हयात नाहीत. पण त्यांचे नाव घेतले पाहिजे, असे मंत्री सामंत आवर्जून म्हणाले. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri

आपण सोशल मिडीयाचा फार मोठा विचार करायला लागलो आहोत. एका विद्वानाने गोडबोले नगरच्या शाळेजवळ वेगळ्या धर्माचे काहीतरी वेगळे निर्माण करण्याचे काम महाराष्ट्र शासनातर्फे केले जात आहे. त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले, किती नतद्रष्ट आहेत हे. त्याचे नाव मला माहिती आहे, कोण आहे तेही माहित आहे, असे सांगून खुलासा करताना सामंत म्हणाले की, विद्यालयात अशी कोणतीही वास्तू होणार नाही, की शरमेने मान खाली घालावी लागेल. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अशी कुठची शक्ती आहे जी सावरकरांच्या विचारांना धक्का देत आहे. आपण ही शक्ती शोधली पाहिजे. ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. चांगल्या कामाला बदनाम केले जाते. राहुल गांधीचे भाऊबंध असावेत. पण ते जर आपल्यात असतील तर त्यांना राहुल गांधींकडे पाठवूया, आपण अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केले तर त्या वाढतात. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सोशल मीडियावरून चुकीचे संदेश व्हायरल केले जात आहे. रत्नागिरीच्या विकासाच्याकरिता क्रांतीकारी विचाराने, सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही सामंत म्हणाले. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri
सावरकरांमुळे स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर- पद्मश्री दादा इदाते
सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पद्मश्री दादा इदाते म्हणाले की, १९२३ ला सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. देशाला पितृ व पुण्यभूमी म्हणतो तो हिंदु अशी व्याख्या त्यांनी केली. १९२४ डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली व शिका, संघर्ष करा असा संदेश दिला. १९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी रा. स्वा. संघाची स्थापना केली. देशाच्या संरक्षणासाठी सावरकरांनी योगदान दिले. १९२४ ते ३७ या काळात सामाजिक कामांची सुरवात सावरकांनी केली. त्यांनी परदेशांतून पिस्तुल पाठवली. त्यातील एक पिस्तुल हुतात्मा कान्हेरे यांना मिळाले. त्यांनी जॅक्सनचा खून केला. त्याचा शोध घेताना सावरकांनी हे पिस्तुल पाठवल्याचे लक्षात आले. हेग न्यायालयात हा विषय आला भारतीय स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय गेला. त्याचे कारण सावरकर होते. सावरकरांनी जात्युच्छेदक निबंध ग्रंथ लिहिला व त्यात एकात्म हिंदुत्वाची हाक दिली. आज आपण दिशेने जातो आहोत. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri

या वेळी पालकमंत्री उदय सामंत, विवेक व्यासपीठाचे रवींद्र गोळे, नंदकिशोर जोशी, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, पतितपावन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिताराम खेडेकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. अनघा निकम-मगदूम यांनी केले. अॅड. आंबुलकर यांनी आभार मानले. Veer Savarkar Jayanti celebrations in Ratnagiri
