• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाशिष्ठीला नेसवली साडी

by Mayuresh Patnakar
March 23, 2024
in Articals
175 2
0
Vashishti wore a saree
344
SHARES
983
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

290 मीटर रुंद पात्रासाठी लागल्या 65 साड्या

गुहागर, ता. 23 : वाशिष्ठी नदीचा उगमापासून संगमापर्यतचा प्रवास जैव विविधतेने नटलेला आहे. या जादुई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जलपर्यटन, जलमार्गाने वहातूक, असे वेगवेगळे विषय जोडले पाहिजेत. त्यातून या नदीच्या तिरांवरील गावे आपण समृध्द करु शकतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाकडे आपण पाहिले पाहिजे. असे प्रतिपादन  कोकण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले. ते परचुरी येथे बोलत होते. Vashishti wore a saree

गुहागर तालुक्यातील परचुरीमध्ये पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर, डॉ. समिधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला. या निमित्ताने 18 मार्च ते 21 मार्च असे चार दिवस हाऊस बोटीत भागवत पुराण व मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले. 22 मार्चला जागतिक जल दिन असल्याने सकाळी नदीचे पूजन करण्यात आले. Vashishti wore a saree

Vashishti wore a saree

वाशिष्ठी नदीची माहिती सांगताना धीरज वाटेकर म्हणाले की, आज जागतिक जलदिन आहे. ही संकल्पना देखील चिपळूणचे मुळ रहिवासी असलेल्या माधवराव चितळे यांनीच संयुक्त राष्ट्र संघात प्रथम मांडली होती. 1637 मध्ये डच लोकांनी व स्वातंत्र्यानंतर 1971 मध्ये गोरे नावाच्या अधिकाऱ्यांनीही वाशिष्ठीचा अभ्यास केला. या अभ्यासातून येथे देशातील मोठे बंदर विकसीत करता येईल असा निष्कर्ष निघाला होता. कै. खासदार बापुसाहेब परुळेकर यांनी वाशिष्ठी नदीच्या विकासाचा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. वाशिष्ठीच्या नदीपात्रात, समुद्राला जवळ असलेले दाभोळ हे भारताच्या इतिहासातील शक्तीशाली बंदर म्हणून ओळखले जायचे. या बंदराचे विस्तारीकरण, उद्योगांची जोड असे वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले. परंतु त्यानंतर दिघी बंदरचा विकास झाला. भारतातील बहुतांश नद्या आज प्रदुषित झाल्या आहेत. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये या नदीला मोकळा श्र्वास घ्यायची संधी मिळाली. त्यानंतर आजपर्यंत न दिसणारे अनेक जलचर याच वाशिष्ठीत दिसून आले. पाण्याची गुणवत्ता सुधारली. नदीचे सौंदर्य पहात आले.  नदीचे हे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, नदी पात्र स्वच्छ राहील, गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरच नातं अधिक घट्ट करावे लागेल. कोकणात प्रथमच त्याची सुरवात आजच्या कार्यक्रमाने झाली आहे. Vashishti wore a saree

Vashishti wore a saree

वाशिष्ठी नदीच्या तिरावर अठरापगड जातींची संस्कृती विकसीत झाली आहे. येथील दाभोळ बंदरातून विदेशामध्ये अनेक प्रकारचा माल निर्यात केला जायचा. या नदीचा उगमापासून संगमापर्यतचा प्रवास जैव विविधतेने नटलेला आहे. या जादुई प्रदेशाचे संवर्धन आपल्याला करावे लागेल.  कोकणाला समृध्द आणि संपन्न करणारी ही संस्कृती पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. जल पर्यटन, जलमार्गाने वहातूक यातून वाशिष्ठीचे वैभव आपण परत आणू शकतो. त्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण आजच्या वाशिष्ठीला साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाकडे पाहिले पाहिजे. Vashishti wore a saree    

माहितीपूर्ण विवेचनानंतर धीरज वाटेकर यांनी उपस्थितांना नद्या स्वच्छ, प्रदुषणमुक्त करण्यासाठी योगदान देण्याची शपथ दिली. त्यानंतर वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. वाशिष्ठी नदीला नेसवलेल्या साड्या या कार्यक्रमानंतर प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील 70-80 ग्रामस्थ कराड, नाशिक, पुणे येथून 30 पर्यटक उपस्थित होते.  Vashishti wore a saree

Vashishti wore a saree

अशी नेसवली साडी

परचुरीमध्ये वाशिष्ठी नदीचे पात्र 290 मिटर रुंद आहे. एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवण्यासाठी 65 साड्या लागल्या. या साड्या एकमेकांना गाठवून लांब पट्टा तयार करण्यात आला होता. एका किनाऱ्यावरुन हा पट्टा एका बोटीद्वारे सोडवत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला. नदीच्या मध्यभागी काही क्षण थांबून नदीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. Vashishti wore a saree

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVashishti wore a sareeगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share138SendTweet86
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.