गटविकास अधिकारी राऊत, जलवाहीनीच्या पाईपचे कोडे सुटणार
गुहागर, ता. 17 : जल जीवन मिशनमधील पाणी योजनेचे काम ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणेच होईल. ठेकेदाराला याबाबतच्या सूचना आम्ही देवू. असे आश्र्वासन गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी वरवेलीच्या ग्रामस्थांना दिले. जलवाहीनीसाठी विशिष्ट कंपनीचेच पाईप वापरावेत या मागणीसाठी वरवेलीमधील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी राऊत यांची भेट घेतली. Varveli villagers met the group development officer
जल जीवन मिशन मधुन वरवेलीच्या पाणी योजनेसाठी सुमारे 1 कोटी 92 लाखांचा निधी मंजूर झाला. निविदा प्रक्रिया पार पडून ठेकेदारही निश्चित झाला. त्यानंतर ही पाणी योजना उत्तम दर्जाची होण्यासाठी वरवेलीच्या ग्रामसभेत चर्चा झाली. या चर्चेमध्ये पाणी योजनेमधील जलवाहीन्यांसाठी 270 कंपन्यांमधुन तीन कंपन्यांची प्राधान्यक्रमाने नावे निश्चित करण्यात आली. तसेच पंपासाठी देखील शासनाच्या यादीमधील एक कंपनी निश्चित करण्यात आली. तसा ठराव ग्रामसभेत झाला. या ग्रामसभेला ठेकेदारही उपस्थित होता. प्रत्यक्षात मे महिन्यात पाणी योजनेच्या कामासाठी ठेकेदाराने साहित्य आणले त्यातील पाईप ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या कंपन्यांचे नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी ठेकेदाराला काम करण्यापासून अडवले. Varveli villagers met the group development officer

सदर योजनेसाठी आवश्यक ती लोकवर्गणी ग्रामपंचायतीने जमा केली. शासनाच्या निर्देशानुसार योजनेसाठी कोणते साहित्य वापरावे याचा ठराव ग्रामपंचायतीने केला. त्यामुळे कामही त्याप्रमाणेच झाले पाहिजे. अशी ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी सरपंच, उपसरपंच व काही ग्रामस्थ यांनी जिल्हा परिषद रत्नागिरीत जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर सोमवारी 17 जुलैला वरवेली ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींसह सुमारे 100 ग्रामस्थांनी गुहागर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे अभियंता छत्रे यांची भेट घेतली. Varveli villagers met the group development officer

ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्यानंतर गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी सांगितले की, ही योजना तुमची आहे. तुम्हाला हवे तसे काम झाले पाहीजे हा तुमचा आग्रह योग्य आहे. आपण केलेली मागणी शासनाच्या निर्देशांनुसार आहे. त्यामुळे ठेकेदाराने कोणतेही साहीत्य गावात आणून ठेवले असले तरी वरवेलीच्या पाणी योजनेसाठी ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणेच साहित्य वापरले जाईल. यासंदर्भात ठेकेदाराजवळ आम्ही बोलु. सध्या पाऊस असल्यामुळे तसेही प्रत्यक्षात कोणतेच काम होणार नाही. पावसाळ्यानंतर तातडीने काम हाती घेऊन डिसेंबरच्या आत योजना कार्यान्वित करुया. ग्रामस्थांनी याचपध्दतीने जागरुक राहुन आपल्या नळ पाणी योजनेचे काम सर्वोत्कृष्ट कसे होईल हे पहावे. Varveli villagers met the group development officer
यावेळी सरपंच नारायण आग्रे, उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य शैलश नारकर, संदिप पवार, धनश्री चांदोरकर, श्रावणी शिंदे, नरेश रांजाणे, अरुण रावणंग, वैभव पवार, पत्रकार गणेश किर्वे यांच्यासह वरवेलीतील सुमारे 100 ग्रामस्थ उपस्थित होते. Varveli villagers met the group development officer
