श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची प्राणप्रतिष्ठापना
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील वरवेली येथील ग्रामदेवता आई श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी ग्रामदेवता आई श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजित भव्य मिरवणूक काढण्यात आली. Varveli Village Deity Ceremony

त्यानंतर श्री हसलाई मंदिरातील देव-देवतांचे पूजन, श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची विधीवत ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठापना व होम हवन करण्यात आले. त्यानंतर आरती, प्रसाद, दुपारी सत्कार सोहळा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यामध्ये कपिल मालवणकर, चंद्रकांत मालवणकर (सांगली), देवीच्या मुर्त्यांसाठी पेटी देणारे प्रल्हाद अशोक रावणंग यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते वसंत विचारे यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये देवीचे रूपे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी भरघोस देणगी देणाऱ्या वरवेली गावातील माहेरवाशिनी यांचे शाब्दिक आभार व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व वाडीतील ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करण्यात आले. Varveli Village Deity Ceremony

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र विचारे यांनी केले. त्यानंतर राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्रमांक १ यांचे बहुरंगी नमन संपन्न झाले. त्यानंतर सिद्धिविनायक रिसॉर्टचे मालक प्रशांत सदानंद विचारे यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला. सायंकाली महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व नागरीक, तालुक्यांतील भाविक, माहेरवाशिणी उपस्थित होते. Varveli Village Deity Ceremony