• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली तंटामुक्त समितीची सभा संपन्न

by Ganesh Dhanawade
September 18, 2023
in Guhagar
50 0
0
Varveli Tantamukt Samiti meeting concluded
97
SHARES
278
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वरवेली तंटामुक्त समितीची बैठक वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष वैभव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वरवेली गावामध्ये मंगळवार पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवा सदर्भात चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव हे नागरिकांनी शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. Varveli Tantamukt Samiti meeting concluded

गौरीगणपती विसर्जन करताना लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात यावी. खोल पाण्यात विसर्जन करताना गणेश भक्तांनी काळजी घ्यावी. अशाही सुचना नागरिकांना करण्यात आल्या. तसेच ग्रामसूरक्षा दल निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. वरवेली आगरेवाडी येथील रविंद्र आगरे यांच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुरू असलेल्या घराचे बांधकाम त्यांच्याच कुटुंबीयांकडून जमीन दोस्त केल्याने त्या घराचा पंचनामा तंटामुक्त समितीने करावा असे ठरले. त्यानुसार जमीन दोस्त केलेल्या घराच्या बांधकामाचा पंचनामा तंटामुक्त समितीने केला. पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी गुहागर पोलीस स्टेशनला पत्र देण्याचे ठरले. गावामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे कुणी काम केले तर तंटामुक्त समितीच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे ठरले.  Varveli Tantamukt Samiti meeting concluded

या सभेमध्ये बोलताना तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार यांनी गावामध्ये तंटे झाल्यानंतर मिटविण्यासाठी जाण्यापेक्षा गावामध्ये तंटेच होणार नाहीत याची खबरदारी तंटामुक्त समितीकडून घेतली जाईल. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले जाईल. जर एखाद्या व्यक्तीने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई तंटामुक्त समितीकडून केली जाईल. गावामध्ये अनेक सोशल मीडियाचे ग्रुप आहेत. या ग्रुप वर समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे मेसेज टाकू नयेत. याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. Varveli Tantamukt Samiti meeting concluded

या सभेला सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, गणेश किर्वे, ग्रामपंचायत सदस्य संदिप पवार, नरेश रांजणे, प्रतिक्षा किर्वे, प्रल्हाद विचारे, आशिष विचारे, विजय रांजणे, सुभाष आगरे, दिवाकर कानडे, संतोष अवेरे, सागर पवार, तलाठी गावित, अनंत जावळे, पो.पा. सुजित शिंदे, ग्रामसेवक महेंद्र भुवड आदी उपस्थित होते. Varveli Tantamukt Samiti meeting concluded

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarveli Tantamukt SamitiVarveli Tantamukt Samiti meeting concludedगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share39SendTweet24
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.