गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिमगोत्सवानिमित्त नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण आगरे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी नमन मंडळामध्ये अनेक वर्ष ही कलाकार नमन कला सादर करत आहेत, परंतु शासनाकडून मिळणाऱ्या कलाकार मानधनापासून वंचित राहू नयेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यातील अनेक कलाकारांना शासनाकडून मानधन मिळण्यासाठी उपयोग होईल. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Varveli Khalchiwadi Naman artists felicitated
या सत्कार कार्यक्रमांमध्ये वसंत सोनू आगरे, वसंत रामचंद्र आगरे, संदीप शिंदे, विवेक रावणंग, विनोद शिंदे, विकास शिंदे, रुपेश तेलगडे, गणेश शिंदे, पंकज आगरे, संजय शिंदे, राहुल भुवड, सुशांत गावडे, ओमकार भुवड, संदीप आगरे, सुशील गावडे, निलेश रावणंग, अशोक धुमक, विकास रावणंग, सागर आगरे, महेश आगरे, चंद्रकांत शिंदे, तेजस शिंदे, गीतकार सचिन आग्रे, महेंद्र अवेरे, अविनाश अवेरे, प्रमोद धोंडू आगरे, नामदेव राणे, आशिष अवेरे आदी कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Varveli Khalchiwadi Naman artists felicitated


या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, दिग्दर्शक जगन्नाथ शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, मधूकर बारगोडे, अनिल अवेरे, वसंत पांडूरंग आगरे, नंदकुमार गावडे, अनंत शिंदे, रमेश आगरे, संतोष अवेरे, राजेंद्र भुवड, मधुकर बारगोडे, रघुनाथ शिंदे, दत्ताराम रावणग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी केले. Varveli Khalchiwadi Naman artists felicitated