अद्यापही कारण गुलदस्त्यात; सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी विरोधात सर्व सदस्य एकटवले
गुहागर, ता. 2: महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर वरवेली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजीनामा सरपंच नारायण आगरे यांना दिला. यामागे गावात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे पाणी कुठेतरी मुरत असल्याची चर्चा असतानाच नेमकं कोणत्या कारणासाठी उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यानी राजीनामा दिला हे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य एकत्र आले असून याची सुरुवात राजीनामा देऊन झाल्याची चर्चाही सर्वत्र होत आहे. Varveli Gram Panchayat Members Resignation

वरवेली ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. काही महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक ३ मधील एका महिला सदस्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता आणि एक ओबीसी महिला उमेदवार उपलब्ध न झाल्याने हे पद अजूनही रिक्तच आहे. सरपंच हे लोकनियुक्त आहेत. उर्वरित ६ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. या सदस्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर अचानक पणे आपले राजीनामे सरपंच नारायण आगरे यांच्याकडे दिले आहेत. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून प्रशासकीय प्रक्रियेतील गंभीर अपारदर्शकता व सदस्यत्वाशी असलेली विश्वासघातकी व एकतर्फी वागणूक, नागरी हक्काचे सर्रास उल्लंघन होत असल्याने अशा कारणांमुळे सदस्यांनी राजीनामा दिल्याचे पुढे येत आहे. Varveli Gram Panchayat Members Resignation

दरम्यान, वरवेलीत जलजीवन मिशन योजना गाजत आहे. जलजीवन योजनेची एकूण १ कोटी ५६ लाखाची ही योजना राबविली जात आहे. यापैकी सुमारे ४८ लाखाचे बील जिल्हा परिषद कडून ठेकेदाराला अदा करण्यात आले. परंतु याची माहिती ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना देण्यात आली नाही. तसेच या संबंधित ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने जिल्हापरिषदेकडून त्याचा ठेका रद्द करण्यात आला. असे असताना सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता एवढे मोठे बील ठेकेदाराला कसे अदा करण्यात आले अशी शंका उपस्थित करण्यात येऊन याची चौकशी करावी या मागणीसाठी १ मे रोजी सरपंच व ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ हे पंचायत समितीसमोर उपोषणालाही बसणार होते. परंतु गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी मध्यस्थी करून या पुढील होणारी कामाची योग्य प्रकारे दखल घेतली जाईल तसेच सर्व ग्रामस्थांना त्याचप्रमाणे ग्रामपंचायत विश्वासात घेऊन ठेकेदाराकडून लोकांच्या मागणीनुसार काम केले जाईल अशी हमी दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण तूर्तास मागे घेतले. Varveli Gram Panchayat Members Resignation

गट विकास अधिकारी यांनी वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जलजीवन मिशनच्या होत असलेल्या नळपाणी योजनेची ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या समवेत मी पाहणी करीन तसेच या कामाला त्वरित सुरुवात केली जाईल ,असे आश्वासन दिले होते. परंतु अचानक पणे सर्व सदस्यांनी राजीनामे दिल्याने एक वेगळाच विषय चर्चेला आला आहे. Varveli Gram Panchayat Members Resignation