कुणबी समाजातर्फे सभागृहाच्या वर्धापन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : चिपळूण तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान खेरशेत बेंडलवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ व १५ एप्रिल २०२४ रोजी बेंडलवाडी सभागृहाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा व भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. Various programs in Khershet
रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते श्री.नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.पर्शुराम घाणेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे त्यानंतर सकाळी ९:३० वाजता कबड्डी स्पर्धांचे मान्यवरांचे हस्ते उदघाटन संपन्न होणार असून दुपारी १:३० वाजता कै.रुक्मिणी रामू बेंडल यांच्या स्मरणार्थ श्री.रविंद्र सखाराम घाणेकर आणि सहपरिवार यांचेकडून भोजन दानाचा, अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर रात्रौ १० वाजता लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Various programs in Khershet
सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ कै.रुक्मिणी व गुणाजी बेंडल यांचे स्मरणार्थ श्री.सोमा बेंडल आणि सहपरिवार यांचेकडून महाप्रसाद, दुपारी ३ वाजता कबड्डी स्पर्धेची सेमी फायनल व फायनल होणार असून रात्रौ १० वाजता श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माभळे (जाधववाडी) तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांचे बहुरंगी नमन आयोजित करण्यात आले आहे. Various programs in Khershet
कबड्डी स्पर्धेसाठी प्रवेश फी ७५०/- रुपये ठेवण्यात आले असून प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक १०,०००/- रुपये, व्दितीय क्रमांकासाठी पारितोषिक ७,०००/- रुपये, तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक ४,००१/-, तर चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक ४,००१/- ठेवण्यात आले असून हि पारितोषिके मुंबई पुणे येथील बेंडलवाडीच्या चाकरमानी यांचे सौजन्याने देण्यात येणार आहेत. Various programs in Khershet