गुहागर, ता. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ गुहागर समाजाच्या महिला कार्यकरणीतर्फे चिखली येथील समाज सभागृहात विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला तालुक्यातील २२५ महिला उपस्थित होत्या. Various programs at Chikhli on Women’s Day


यावेळी उपस्थित मान्यवरांचे महिला अधक्ष्या सौ. प्रितम नाटुस्कर, महिला उपाध्यक्षा सौ. प्रज्ञा ताम्हणकर व इतर महिला पदाधिकारी यांनी स्वागत केले. यावेळी श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लहान मुले व महिला भगिनींनी स्वागत नृत्य सादर केले. यानिमित्त महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. Various programs at Chikhli on Women’s Day


या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष धामणस्कर गुरूजी, कोषाध्यक्ष श्री. काणेकर गुरुजी, सल्लागार श्री. सदानंद धामणस्कर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला कार्यकारणी व इतर महिला तसेच तालुका अध्यक्ष सुमित नांदलस्कर, सहसचिव पुष्कर नाटूस्कर, खजिनदार अरविंद पिंपळकर, दत्ताराम धामणस्कर यांनी मेहनत घेतली. Various programs at Chikhli on Women’s Day