• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बचत गटाच्या स्टॉलवर पर्यटकांसह नागरिकांचा प्रतिसाद

by Ganesh Dhanawade
December 27, 2022
in Guhagar
218 2
0
Various products of self-help groups
427
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पोलीस परेड ग्राऊंड शेजारी गटाची विविध उत्पादने विक्रीस

गुहागर, ता. 27 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील बचत गटाचे हिरकणी शहरस्तर स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या अंतर्गत गुहागर शहरातील बचत गटांच्या मालाचे विक्री करण्यासाठी गुहागर पोलीस परेड ग्राऊंड रोड शेजारी नाताळ व नववर्षानिमित्त विविध उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक गजानन वेल्हाळ यांचे हस्ते करण्यात आले. Various products of self-help groups

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्षा प्रणिता प्रविण साटले, आरोग्य सभापती स्नेहा सुनिल रेवाळे, नगरसेवक माधव साटले, गटनेता उमशे भोसले, संजय मालप, नगरसेविका मृणाल गोयथळे, मनाली सांगळे, सुजाता श्रीधर बागकर, प्रशासकीय अधिकारी पेढांबकर, समुदाय संघटक सुचिता आंबोकर, नगरपंचायत कर्मचारी, महिला बचतगटाच्या रश्मी पालशेतकर, पारिजात कांबळे आदी उपस्थित होते. Various products of self-help groups

Various products of self-help groups

या स्टॉलमध्ये श्री नाम्या स्वयंसहाय्यता महिला बचत गट, श्री सदगुरू कृपा स्वयं सहाय्यता महिला बचत गट, मोरेश्वर स्वयं सहाय्यता महिला बचत गट, श्री चंडीका स्वयं सहाय्यता महिला बचत गट, आम्रपाली स्वयं सहाय्यता महिला बचत गट, श्रेयस स्वयंमसाह्यता महिला बचत गट, श्री गौरोजी बावा स्वयंसहाय्यता महिला बचत गट, दुर्गाश्री स्वयं सहाय्यता महिला बचत गट सहभागी झाले आहेत. यामध्ये श्री नाम्या स्वयं.सहा. महिला बचत गट यांनी कुळीथ पीठ, श्री सद्गुरु कृपा यांनी महिला बचत गट यांनी कोकम आगळ सांडगी विक्री, मोरेश्वर स्वयं.सहा.महिला बचत गट अगरबत्ती विक्री, श्री चंडीका स्वयं. सहा. महिला बचत गट सर्व प्रकारचे पीठ विक्री, आम्रपाली स्वयं. सहा. महिला बचत गट पोष्टीक लाडू विक्री, श्रेयस स्वयं सहा. महिला बचत गट कोकणी उत्पादने, खाद्य पदार्थ विक्री, श्री गौरोजी बावा स्वयं.सहा. महिला बचत गट कोकणी खाद्य पदार्थ, शाकाहारी व मांसाहारी पदार्थ विक्री, दुर्गा श्री स्वयं. सहा. महिला बचत गट ज्वेलरी विक्री अशी दुकाने लावली आहेत. Various products of self-help groups

या स्टॉलला गुहागर तालुक्यात आलेले पर्यटक तसेच तालुक्यातील नागरिक भेटी देऊन उत्पादने खरेदी करत आहेत. उत्पादन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. Various products of self-help groups

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarious products of self-help groupsगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share171SendTweet107
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.