• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

by Ganesh Dhanawade
February 25, 2023
in Guhagar
159 2
0
Various events for Shiv Jayanti at Pimpar
313
SHARES
893
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्नेहबंध जोपासत गावाची एकजुट कायम राखण्यात यश

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील पिंपर येथील तरुणांनी यंदा ही सर्व ग्रामस्थांना एकत्रित आणत शिवजयंती उत्साहात साजरी केली. गावातील तरुण वर्गाने एकत्रित येत गावामध्ये यंदा दुसर्‍यांदा शिवजयंती साजरी केली. ह्या कार्यक्रमाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. Various events for Shiv Jayanti at Pimpar

यावेळी गावातील ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडे दहा वाजता गावातील जेष्ठ नागरिक, सरपंच, शासकीय कर्मचारी, गावातील तरुण-तरुणी, महिला वर्ग व लहान मुले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जि. परिषद शाळा पिंपर क्र. १ चे विद्यार्थी व दाभोळकर सर यांनी स्वागत गीत, महाराष्ट्र गीत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित शिवरायांची आरती सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना दिली व अखंड जनसमुदाय यावेळी महाराजांचा जयजयकार करीत होता. Various events for Shiv Jayanti at Pimpar

या कार्यक्रमनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रख्यात वक्ते श्री. प्रकाश गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासच सांगितला नाही तर, त्यांनी लावलेली शिस्त, जपलेली मुल्ये आपल्या दैनंदिन जीवनात कशी वापरता येईल याचे उदाहरणासह दाखले देऊन त्यांनी उपस्थित श्रोत्यांना पटवून दिले. यावेळी सर्वांना महाभोजनाची व्यवस्था या तरुण वर्गाकडून करण्यात आली होती. Various events for Shiv Jayanti at Pimpar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

दुपार सत्रानंतर वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी व व्यसन मुक्तीवर दोन पथनाट्ये सादर केली. या पथनाट्यातून समोज प्रबोधन करण्यात आले. पथनाट्यासाठी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा पार पडला. सदर पालखी सोहळा पिंपर मारुती मंदिर येथून गणपती मंदिर पर्यंत व तेथून परत मारुती मंदिर येथे स्वरब्रह्म: ढोल ताशा पथक, चिपळूण यांच्या उपस्थित पार पडला. या संपूर्ण शिवमय सोहळ्यामुळे गावात उत्सवाचे व प्रसन्नाचे वातावरण होते. अशाच प्रकारे स्नेहबंध जोपासत गावाची एकजुट कायम राखूया, अशी सदिच्छा उपस्थित नागरिकांनी दिल्या. Various events for Shiv Jayanti at Pimpar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarious events for Shiv Jayanti at Pimparगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.