• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेजमध्ये नवरात्रीनिमित्त विविध स्पर्धां

by Ganesh Dhanawade
October 1, 2022
in Guhagar
17 0
0
Various competitions in Regal College

रिगल कॉलेज

33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नवरात्रीनिमित्त बोंडला सजावट व थिम डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवरात्रीच्या प्रत्येक रंगानुसार विविध कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी आपली थिम ठरवलेली आहे. सामाजिक जागरूकतेची जाणीव निर्माण होण्याकरिता विविध सामाजिक संदेश त्यांना आपल्या थिमद्वारे द्यायचा आहे. Various competitions in Regal College

दि. २७ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या द्वितीय दिवशी लाल रंगाची सजावट रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्रथम वर्ष BCA(Bachelor of Computer Application) च्या विद्यार्थ्यांनी केली. त्यांनी Blood Donation हि थिम निवडली होती व त्यानुसार अत्यंत आकर्षक पद्धतीने बोंडला काढला व सेल्फी पाँइंट तसेच इतर सजावट केली. आपल्या या थिमद्वारे त्यांनी रक्तदानाचे महत्त्व व आज काळाला त्याची किती गरज आहे हे पटवून दिले व “रक्तदान करा व जीवनदान द्या ” असे आवाहन केले. Various competitions in Regal College

Various competitions in Regal College

दि. २८ सप्टेंबर नवरात्रीच्या तृतीय दिवशी कुष्मांडा देवीच्या उत्सवानिमित्त  निळ्या रंगाची सजावट रिगल कॉलेजच्या द्वितीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लीकेशन (BCA) च्या विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थीनिंनी सर्वधर्म समभाव हि थिम निवडली होती व त्यानुसार अत्यंत आकर्षक पद्धतीने बोंडला काढला व सेल्फी पाँइंट तसेच फ्रंट ऑफिस डेकोरेशन केले. या थिमद्वारे त्यांनी भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. त्यामुळे सर्वधर्म समभाव ठेऊन आपल्या देशामध्ये  सामाजिक एकोपा व शांतता राखावी असा संदेश त्यांनी आपल्या थिमद्वारे दिला. Various competitions in Regal College

दि. २९ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाची सजावट रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्रथम वर्ष बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लीकेशन (BCA) च्या विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थ्यांनी “लेक वाचवा” हि थिम निवडली व त्यानुसार अत्यंत आकर्षक पद्धतीने बोंडला काढला व सेल्फी पाँइंट तसेच फ्रंट ऑफिस डेकोरेशन केले. आजही भारतामध्ये स्त्री-पुरुष असमानता आढळते. मुलींवर बलात्कार, हुंडाबळी या समाजाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी दिसून येतात. हे सर्व गुन्हे थांबून स्त्रियांनाही समान हक्क मिळायला हवा असा संदेश विद्याथ्यांना आपल्या थिमद्वारे दिला. Various competitions in Regal College

Various competitions in Regal College

दि. ३० सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरव्या रंगाची सजावट रिगल कॉलेज शृंगारतळीच्या द्वितीय वर्ष बी. एस्सी. (हॉस्पीटीलिटी स्टडीज)  च्या विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थ्यांनी “निसर्ग  वाचवा” हि थिम निवडली. केरळ पद्धतीने कोणत्याही कृत्रिम वस्तूंचा सजावटीसाठी वापर न करता अत्यंत आकर्षक पद्धतीने बोंडला काढला व सेल्फी पाँइंट, तसेच फ्रंट ऑफिस डेकोरेशन केले. जगात प्लास्टिक व इतर निसर्गावरती अन्याय करून तयार होणाऱ्या कृत्रिम वस्तूंचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे  मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व निसर्गाची हानी होते. त्यामुळे  निसर्ग वाचवून भविष्य वाचवा असा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या थिमद्वारे दिला. Various competitions in Regal College

Various competitions in Regal College

रिगल कॉलेज शृंगारतळीतील विद्यार्थ्यांसाठी असे नवनवीन उपक्रम राबवीत असते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Various competitions in Regal College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVarious competitions in Regal Collegeगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.