गुहागर, ता. 13 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात १ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत “चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत शाळा स्तरावर निबंध स्पर्धा, वकतृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व प्रभात (जनजागृती ) फेरी हे उपक्रम राबविण्यात आले होते. Various competitions in Patpanhale School
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणुया नदीला ” अभियानांतर्गत शालेय स्तरावर नदीचे व पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांची घोषणांनी प्रभात (जनजागृती ) फेरी पाटपन्हाळे हायस्कूल व शृंगारतळी बाजारपेठ या परिसरामध्ये सादर करण्यात आली. तसेच इयत्ता १ली ते ५वी गट, इयत्ता ६ वी ते ८ वी गट व इयत्ता ९ वी ते १२ वी गटात, शालेय स्तरीय प्रभात (जनजागृती ) फेरी , निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. हे कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले Various competitions in Patpanhale School
शालेयस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- इयत्ता १ ली ते ५ वी या गटात – कु. कस्तुरी संतोष घाणेकर, ५ वी, ६ वी ते ८ वी गटात – कु. मानसी संदीप पालकर, ७ वी, ९ वी ते १२ वी गटात – कु. जान्हवी प्रफुल्ल विचारे यांनी संपादन केला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता ६ वी ते ८ वी गटात- कु. मृण्मयी दत्ताराम जाधव, ७ वी, इयत्ता ९ वी ते १२ वी गटात – कु.आर्या निलेश चाळके, 9 वी, यांनी संपादन केला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक – इयत्ता ६ वी ते ८ वी गटात कु. श्रीया संतोष नागेश, ७ वी, इयत्ता ९ वी ते १२ वी गटात – कु. हर्ष नागेश जानवळकर, ९ वी यांनी संपादन केला. Various competitions in Patpanhale School

“चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात शाळास्तरीय उपक्रम राबविण्याचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस. एस. चव्हाण व सहकारी शिक्षक यांनी केले होते. निबंध, वक्तृत्व, चित्रकला या स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थी व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक एम.ए. थरकार व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. Various competitions in Patpanhale School

