आ. शेखर निकम यांनी दिल्लीत घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट
नवी दिल्ली, ता. 01 : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. Vande Bharat should get a stopover in Chiplun

यावेळी वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर आमदार शेखर निकम यांनी ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. Vande Bharat should get a stopover in Chiplun

