गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था रत्नागिरी यांच्या वतीने शृंगारतळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. Vaishiratna Award to Shrikrishna Belwalkar
रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था रत्नागिरी यांच्या वतीने कै. राधाताई लाड सभागृह वैश्य भवन चिपळूण येथे जिल्हास्तरीय वैश्यवाणी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यासाठी विभास खातू (अध्यक्ष वैश्यवाणी समाज संस्था, महासंघ वरिष्ठ उपाध्यक्ष, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन), प्रमोद जठार (माजी आमदार), अॅड. विलास पाटणे (उपाध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन संस्था), आनंद मापुस्कर (करिअर मार्गदर्शक व उच्च शिक्षण अभ्यासक), दिलीप महेश्वरी (अध्यक्ष कन फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, मुंबई उपाध्यक्ष, आतंरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन मुंबई), डॉ. विकास शेट्ये (अध्यक्ष), हेमंत शिरगावकर (उपाध्यक्ष), माधव शेट्ये (सचिव), श्रीनाथ खेडेकर (युवक अध्यक्ष), स्मिता लाड (महिला अध्यक्ष) व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. Vaishiratna Award to Shrikrishna Belwalkar

श्रीकृष्ण बेलवलकर हे गेली १५ वर्षे वैश्यवाणी समाज गुहागर तालुका या संस्थेचे सचिवपद सांभाळत आहेत. गुहागर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असते. श्री निळकंठेश्वर मंदिर शृंगारतळी याचे विश्वस्त म्हणून सेवा करित आहेत. त्यांच्या या विशेष कामगिरीमुळे जिल्हास्तरीय वैश्यरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. Vaishiratna Award to Shrikrishna Belwalkar
