धोपावे अपघातातील मृत महिलेच्या अंत्यसंस्करासाठी उपलब्ध केला वैकुंठरथ
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील धोपावे येथे गुरुवारी सकाळी एसटी बस खाली मृत पावलेल्या वृद्ध महिलेच्या अंतिम कार्यासाठी गुहागर नगरपंचायतीच्या वैकुंठ रथाची आवश्यकता होती. याची माहिती गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक समीर घाणेकर समजली. त्यांनी परिवहन महामंडळाला तत्काळ वैकुंठ रथ उपलब्ध करून दिला. Vaikuntharath for cremation at Dhopave


गुहागर आगार व्यवस्थापनाकडून नगरपंचायतीकडे वैकुंठ रथाची मागणी करण्यात आली होती. मात्र नगरपंचायतीचे चालक अन्य कामांसाठी गेल्याने हा वैकुंठ रथ अपघात स्थळी जाण्यासाठी दोन तासांचा अवधी लागणार होता. ही गांभीर्याची माहीती समजताच नगरपंचायतीचे कार्यक्षम नगरसेवक श्री. समीर घाणेकर यांनी परिवहन महामंडळाचे संदीप वैद्य आणि सुभाष पावसकर यांच्याकडे तात्काळ संपर्क करून या रथावर चालक अन्य कामासाठी बाहेर गेले आहेत. चालक नाही आहे. चालकाची उपलब्धता आपण गुहागर आगाराने करून दिल्यास वैकुंठ रथ नगरपंचायत देण्यास तयार असल्याचे सांगितले. Vaikuntharath for cremation at Dhopave
नगरसेवक श्री. समीर घाणेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नगरपंचायतीचा वैकुंठ रथ आणि गुहागर आगाराचा चालक असे जुळून हा वैकुंठरथ त्या निधन पावलेल्या वृद्ध महिलेच्या अंतिम कार्याकरीता धोपावेकडे रवाना झाला. गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक घाणेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेचे गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्र व गुहागर आगार आणि धोपावे परिसरातून कौतुक होत आहे. Vaikuntharath for cremation at Dhopave