१५ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम, तर खुल्या गटात तृतीय क्रमांक
गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या गटात पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर खुल्या गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिची जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमधून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या गटातून ४ खेळाडूंची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. पद्मश्री हिला प्रशिक्षक चैतन्य भिडे यांचे मार्गदर्शन लाभले. Vaidya selected for state competition
पद्मश्री वैद्य हिने आतापर्यंत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणच्या वतीने २०१९ मध्ये झालेल्या जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. त्यानंतर बुद्धिबळ स्पर्धा २०२०- २०२१ मध्ये रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेतल्या गेल्या होत्या. त्या स्पर्धमध्ये सुध्दा पद्मश्री मुलींच्या गटामध्ये प्रथम आली होती. २०२२ मध्ये आर. बी. सप्रे मेमोरिअल ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पद्मश्री वैद्य हिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. Vaidya selected for state competition