• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओमानजवळ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर अमेरिकेचा हल्ला

by Guhagar News
June 11, 2026
in Bharat
47 0
0
US attack on an Indian ship
92
SHARES
263
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 ३ भारतीयांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह सापडले

नवीदिल्ली, ता, 11 : पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता अधिकच उग्र झाला असून, या संघर्षात भारताला मोठा फटका बसला आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची खाडी) जवळ एका व्यापारी जहाजावर अमेरिकेकडून झालेल्या थेट हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. US attack on an Indian ship

ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला होता. बुधवारी, १० जून रोजी ‘सेटेबेलो’ नावाच्या व्यावसायिक मालवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आले. या जहाजावर एकूण २८ क्रू सदस्य होते. यामध्ये तब्बल २४ भारतीय नागरिकांचा समावेश होता. भारताने या भ्याड हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. US attack on an Indian ship

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हल्ल्यानंतर तातडीने राबवण्यात आलेल्या मदत आणि बचाव मोहिमेमुळे २४ पैकी २१ भारतीय क्रू सदस्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. त्यातील तीन जण बेपत्ता होते. अखेर दोघांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. US attack on an Indian ship

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUS attack on an Indian shipओमानटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजहोर्मुझ
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.